Life On Mars: मंगळावर सापडले सेंद्रिय पदार्थांचे नमुने; लालग्रहावरील जीवसृष्टीच्या ‘या’ असू शकतात पाऊलखुणा | पुढारी

Life On Mars: मंगळावर सापडले सेंद्रिय पदार्थांचे नमुने; लालग्रहावरील जीवसृष्टीच्या 'या' असू शकतात पाऊलखुणा

पुढारी ऑनलाईन: मंगळावरील प्राचीन नदी डेल्टाचा शोध घेत असताना, नासाच्या पर्सव्हरन्स रोव्हरने (Perseverance rover) काही नमुने गोळा केले आहेत. मंगळावर शोधण्यात आलेल्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात  सेंद्रिय पदार्थांचे  नमुने सापडले आहेत.  या नमुन्यांवरून मंगळावरही जीवसृष्टी असू शकते, याच्या पाऊलखूणा नासाच्या शास्त्रज्ञांना मिळालेल्या आहेत.

नासाच्या पर्सव्हरन्स रोव्हरने (Perseverance rover) ने गोळा केलेले नमुने असे सूचित करतात, की येथील प्रदेश हा सेंद्रिय पदार्थाने समृद्ध आहे. नासाच्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, मंगळावर कधी जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही हे शोधण्यासाठी पर्सव्हरेन्स रोव्हर सध्या मंगळ मोहिमेवर आहे. पण या संशोधना दरम्यान मंगळावर नवीन सापडलेली ही सेंद्रीय संसाधने मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेणाऱ्या मिशनसाठी अत्यंत महत्वाची ठरू शकणार आहेत.

रोव्हरने मंगळावरील स्किनर रिज नावाच्या परिसरात काही नमुने गोळा केलेत आणि येथील काही प्रदेशाचे मोजमापही घेतले. हा प्रदेश गाळाच्या खडकांपासून बनलेला आहे, असे म्हटले जाते. ज्यामध्ये असलेल्या काही सामग्री या अब्जावधी वर्षांपूर्वी वाहत्या पाण्याद्वारे शेकडो किलोमीटर दूरवरून वाहून आल्या असल्याचे महटले जाते.

या गाळाच्या खडकांमध्ये अरोमॅटिक्स नावाचे सेंद्रिय रेणू तसेच चिकणमाती आणि सल्फेट खनिजे असतात. जेव्हा पाणी खडकाशी संपर्क साधते तेव्हा याप्रकारची जमीन तयार होते, असे म्हटले जाते. या पर्सव्हरन्स रोव्हरने (Perseverance rover) मिशनने अद्याप मंगळवरील जीवनाच्या कोणत्याही चिन्हांची पुष्टी केलेली नाही. पण या नवीन शोधामुळे हे मंगळावरील जीव असत्तित्वाचे संशोधन योग्य दिशेने चालू असल्याचे समजते.

पॅसाडेना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील पर्सव्हरेन्स प्रकल्पाचे शास्त्रज्ञ, केन फार्ले म्हणाले, डेल्टावर आम्ही ज्या खडकांचा शोध घेत आहोत, त्यामध्ये सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण सर्वाधिक आहे. १८ महिन्यापूर्वी मंगळासारख्या लालग्रहावर सुरू करण्यात आलेल्या पर्सव्हरेन्स रोव्हरच्या मिशनमध्ये प्राचीन सूक्ष्मजीव जीवन शोधणे समाविष्ट आहे. आत्तापर्यंत, या मिशनमध्ये रोव्हरमध्ये 12 खडकांचे नमुने गोळा केले आहेत. हे मिशन २०३० च्या अखेरीस पृथ्वीवर नमुने घेऊन जाणार असल्याचेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button