पैशांचा खेळ : अदानींची श्रीमंती काही तासांत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर | पुढारी

पैशांचा खेळ : अदानींची श्रीमंती काही तासांत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर

पैशांचा खेळ : अदानींची श्रीमंती काही तासांत पुन्हा तिसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली – पुढारी ऑनलाईन : अब्जाधिश उद्योगपती गौतम अदानी शुक्रवारी सकाळी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती बनले, पण त्यांचा हा दुसरा क्रमांक काही तासांसाठीच राहिला. भारतीय शेअर बाजार गडगडल्यानंतर अदानींच्या श्रीमंतीत पुन्हा घट होऊन ते तिसऱ्या क्रमकांवर घसरले. फ्रान्समधील उद्योगपती बर्नाड अर्नाल्ट पुन्हा दुसऱ्या क्रमांकवर गेले आहेत. अर्थात अदानी आणि अर्नाल्ट यांच्या संपत्तीत फार मोठा फरक राहिलेला नाही.

फोर्बस रिअल टाईम बिलिनियर लिस्टमध्ये जगातील अब्जाधिशांच्या संपत्ती आणि क्रमावीर रिअल टाईमध्ये नोंदवली जाते. यात शुक्रवारी दुपारी ३ वाजता अदानी यांची संपत्ती १५२ अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली आहे. त्यांची ही संपत्ती दुपारी १ वाजता १५५.७ अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली होती. तर अर्नाल्ट यांची संपती १५३.२ अब्ज डॉलर इतकी नोंदवण्यात आली आहे.

real time billionaires

तर इलन मस्क यांची संपत्ती २७३.५ अब्ज डॉलर इतकी आहे. अदानी यांच्या संपत्तीत गेल्या अडीच वर्षांत १३ पट इतकी मोठी वाढ झालेली आहे. जगातील पहिल्या ३ श्रीमंतात झळकणारे ते पहिले भारतीय आणि पहिले आशियायी उद्योगपती आहेत.

हेही वाचा

Back to top button