‘या’ देशात कार नसणाऱ्यांना सरकार देणार १ हजार डॉलर; जाणून घ्या काय आहे कारण? | पुढारी

'या' देशात कार नसणाऱ्यांना सरकार देणार १ हजार डॉलर; जाणून घ्या काय आहे कारण?

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या लक्षात घेऊन कॅलिफोर्निया सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. अमेरिकन लोकांना त्यांच्या कार खूप आवडतात; पण कॅलिफोर्नियाने त्यांचे विचार बदलण्याच्या उद्देशाने एक मूलगामी धोरण स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या रहिवाशांकडे कार नाही किंवा ज्याचे उत्पन्न हे कमी आहे अशांना १००० डॉलर देण्याचा निर्णय कॅलिफोर्निया सरकारने घेतला. या संबंधिचे पहिले धोरण लवकरच म्हणजे सप्टेंबर महिन्यातच मंजूर करण्यात येणार असल्याचेही सरकारी (डॉलर) सूत्रांनी स्‍पष्‍ट केले आहे.

राज्याचे कार्बन उत्सर्जन शक्य तितक्या लवकर कमी करणे तसेच वायू प्रदूषण कमी करण्‍यासाठी काही उपाय सुचविण्यात आले. या उपायांमध्ये कॅलिफोर्निया विधानसभेने हा निर्णय घेतला आहे की, कार नसणार्‍या नागरिकांना १ हजार डॉलर इतकी रक्कम देण्यात येईल. ही रक्कम ४० हजार डॉलर कमाई (डॉलर)  करणारे सिंगल फायलर्स आणि ६० हजार डॉलर कमाई असणारे जॉइंट फाइलर्संना मिळणार आहे. कर देणारे असूनही ज्यांच्याकडे स्वत:च्या मालकीची कार नाही, असे नागरिक या योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत.

कॅलिफोर्नियाने केवळ गॅसवर चालणार्‍या नवीन वाहनांच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतल्यानंतर हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. याचबरोबर विधानसभेत तेलाच्या विहिरी आणि शाळा, डे-केअर ईमारतींमध्ये ३२०० फूट बफर झोन घोषित करण्यात येऊन, यासंबंधी कायदा देखील पास करण्यत आला आहे. डायब्लो कॅनॉन अणु प्रकल्पही खुला ठेवण्याच्या योजनेलाही मंजुरी (डॉलर) देण्यात आली आहे. २०३५ पर्यंत स्वच्छ स्त्रोतांपासून ९० टक्के वीज निर्मिती करणे आणि २०४५ पर्यंत हरितगृह वायू उत्सर्जन ८५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठवले आहे.

 वाहनांवर बंदी घालणारे जगातील पहिले राज्‍य सरकार

काही दिवसापूर्वी अमेरिकेतील (डॉलर) कॅलिफोर्निया राज्य सरकारने इंधनावर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल बंद करण्यात आले होते.असा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालणारे कॅलिफोर्निया सरकार हे जगातील पहिले सरकार ठरले होते. ही बंदी २०३५ पासून लागू होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button