इन्स्टाग्राम तरुण, आणि सेलेब्रिटिंमध्ये विशेष प्रसिद्ध असणारे ॲप आहे. फोटो शेअरिगं आणि रिल्स यामुळे हे ॲप अनेकांच्या आवडची आहे. पण यामध्ये एक कमतरता आहे, ती म्हणजे यावरील कोणतीही पोस्ट रिपोस्ट करता येत नाही; पण लवकरच इन्स्टाग्रामवर रिपोस्टसाठीची फिचर मिळणार आहे. (Instagram Repost Feature)
इन्स्टाग्राम हे फेसबुकच्या मालकीचे ॲप आहे. फोटो शेअरिगं ही ॲपची विशेष ओळख आहे. गेल्या काही वर्षांत हे शॉर्ट व्हिडिओसाठीही इन्स्टाग्रामची खास ओळख बनली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर उडणारा राजकीय धुरळा इन्स्टाग्रामवर नसल्याने अनेकांची पसंती ही इन्स्टाग्रामसाठी आहे.
या कंपनीच्या प्रवक्त्यांनी एक वेबसाईटला इन्स्टाग्रामवर रिपोस्टची फिचर देण्याबद्दल विचार सुरू असल्याचे सांगितले. "लोकांना जे आवडते ते त्यांना रिपोस्ट करता यावे आणि ज्याचा कंटेट आहे, त्याला त्याचे श्रेयही मिळाले पाहिजे अशा प्रकारे रिपोस्टचे फिचर फीडमध्ये देण्याचा विचार आहे," असे या प्रवक्त्याने सांगितले.
पण ज्याचा कंटेट शेअर केला आहे, अशा व्यक्तीच्या प्रोफाईल रिपोस्ट कशी लिंक केली जाईल, याचा खुलासा अजून झालेला नाही. सुरुवातीला फक्त काही युजर्सना हे फिचर दिले जाणार आहे. त्यानंतर अँड्रॉईड आणि आयओएस असा दोन्हीवर हे इन्स्टाग्रामसाठी हे फिचर येणार आहे.