मातोश्रीच्या दुकानातून तक्रारींच मार्केंटिंग सुरु : नारायण राणे | पुढारी

मातोश्रीच्या दुकानातून तक्रारींच मार्केंटिंग सुरु : नारायण राणे

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना नेते सदा सरवणकर यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले, “मातोश्रीच्या दुकानात तक्रारींच मार्केंटिंग सुरु आहे. दसरा सोहळा खरी शिवसेना शिंदेगट हेच करतील, शिंदे गटाची ताकद आम्हाला कळली आहे.मी आमदार सदा सरवणकर यांची भेट घ्यायला आलो आहे. सरवणकर आणि यांना मारण्यासाठी ५० जण धावले होते. या प्रकरणाची चौकशी  पोलीस करतील.”

काय आहे प्रकरण ?

प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसैनिक गणपती विसर्जन मिरवणुकीत आमने-सामने आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या. तर, शिंदे गटाकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी हा संघर्ष टळला. मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले होते..

शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील दादरमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना शुभेच्छा देणारे दादर व माहिम परिसरातील पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले. सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली. मात्र या घटनेनंतर अद्याप सरवणकर गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेना आणि सदा सरवणकर यांच्या वादात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची एंन्ट्री झाल्याने या वादाला कोणते वळण मिळणार यावरुन राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button