राहुल म्हणाले, त्या दिवशी माझ्या वडिलांचे काका संजय गांधी यांनी ऐकले नाही | पुढारी

राहुल म्हणाले, त्या दिवशी माझ्या वडिलांचे काका संजय गांधी यांनी ऐकले नाही

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन: ‘त्या दिवशी माझ्या वडिलांनी विमान उडवू नका असे माझे काका संजय गांधी यांना सांगितले होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही आणि दुर्घटना घडली. प्रचंड वेगाचे विमान धडकून त्यांचा मृत्यू झाला. ऐकले असते तर कदाचित ते हयात असते,’ असा खुलासा राहुल गांधी यांनी केला.

गुरुवारी सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत त्यांनी ही बाब सांगितली. भारतीय युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या राजीव गांधी यांच्या फोटो प्रदर्शनात बनवलेल्या व्हिडीओमध्ये राहुल यांनी वडिलांसोबत विमानात घालवलेल्या आठवणी सांगितल्या.

राहुल गांधी यांनाही त्यांचे वडील राजीव गांधी यांच्याप्रमाणे विमान उडवण्याचा शौक आहे.

वडील राजीव गांधी यांची आठवण काढताना ते म्हणाले, त्यांचा असा विश्वास होता की, ‘पायलट असणे सार्वजनिक जीवनातही बरेच काही शिकवते.’

ते पुढे म्हणाले,‘ज्या दिवशी राजीव यांचे बंधू संजय गांधी यांचे विमान अपघातात निधन झाले,

त्या दिवशी राजीव यांनी त्यांना ‘पिट्स’सारखे आक्रमक विमान उडवण्यास मनाई केली होती. पण त्यांनी ऐकले नाही.

ते दररोज सकाळी वडिलांसोबत विमानातून बाहेर जायचे आणि दोघांनाही विमान उडवणे आवडायचे.

ज्या दिवशी भीषण अपघात झाला त्या दिवशी राजीव गांधी यांनी आपले लहान भाऊ संजय गांधी यांना विमान उडवण्यास मनाई केली होती.

माझे काका एक विशेष प्रकारचे विमान उडवत होते. ते पिट्स होते. ते खूप वेगवान विमान होते.

माझ्या वडिलांनी त्यांना रोखले होते.

पण त्यांनी ऐकले नाही. माझ्या काकांना तीन ते साडेतीन सात विमान उडविण्याचा अनुभव होता.

२३ जून १९८० रोजी नवी दिल्लीच्या सफदरजंग विमानतळाच्या बाजुला संजय गांधी चालवत असलेले विमान कोसळले यात ते जागीच ठार झाले.

संजय गांधीही होते पायलट

१९७६ मध्ये संजय गांधी यांना कमी वजानाची विमाने उडविण्याचा परवाना मिळाला होता. मात्र, आणीबाणीनंतर हा परवाना मोरारजी देसाई यांनी रद्द केला होता.

पुन्हा काँग्रेसचे सरकार आल्यानंतर त्यांना तो मिळाला. संजय गांधी आक्रमक होते आणि अगदी कार चालविल्याप्रमाणे ते विमान चालवत असत.

१९८० मध्ये इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय धीरेंद्र ब्रह्मचारी यांनी संजय यांच्यासाठी पिट्स एस 2 ए विमान आणले होते.

त्याची जोडणी सफदरजंग विमानतळावर अगदी घाईगडबडीने करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांतच या विमानाला अपघात झाला.

हेही वाचा:

Back to top button