वाचा, मोबाईल बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी तज्‍ज्ञांनी दिलेल्या खास टिप्स | पुढारी

वाचा, मोबाईल बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी तज्‍ज्ञांनी दिलेल्या खास टिप्स

पुढारी ऑनलाइन डेस्क : हल्ली प्रत्येकाकडेच स्मार्टफोन आहे. त्यापैकी 99 टक्के लोकांना अनेकवेळा अनेकांच्या फोनला बॅटरी बॅकअपचा प्रश्न सतावतो. अनेकदा गरजेच्या वेळी बॅटरी संपते.  अनेक वेळा चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यामुळे बॅटरीचे आयुष्य कमी होते. अर्थात मोबाईलची बॅटरी निकामी होते. परिणामी तुमच्यावर स्मार्टफोनची बॅटरी बदलण्याची वेळ येते. या सर्वांवर काय उपाय आहे याची माहिती लिथियम बॅटरीचा अभ्यास करणा-या दोन तज्‍ज्ञांनी  ‘द वॉशिंगटन पोस्ट’ ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे.

या मुलाखतीत मिशिगन विद्यापीठाचे ग्रेगरी ए. केओलियन आणि मेरीलँड विद्यापीठाचे जी. पेच यांनी सगळ्यात महत्त्वाचा सल्ला दिला तो म्हणजे, उत्पादकांनी दिलेल्या विशिष्ट सल्ल्याचे पालन करणे. आपण जेव्हा मोबाईल विकत घेतो. त्यावेळी त्यासोबत एक बॉक्स आणि त्यामध्ये तो मोबाईल, गॅझेट किंवा लॅपटॉप कसा वापरावा याचे काही थोडक्यात दिलेले दिशा निर्देश असतात. यामध्ये मोबाईलची बैट्री कधी, किती वेळ चार्जिंग करावी किंवा कोणकोणत्या चार्जरने तुम्ही चार्ज करू शकतात. जेणेकरून बॅटरी आणि पूर्ण गॅझेट अतिशय व्यवस्थित आणि दीर्घ काळ चालेल याचे तपशील त्यात दिलेले असतात. ही माहिती समजून घेऊन त्याप्रमाणे गॅझेटची बॅटरी चार्ज केल्यास आपल्याला ऐन वेळी लो बॅटरी असणे, बॅटरी दीर्घकाळ चालणे, बॅटरीचे सर्व सामान्य आयुष्य वाढवते.

वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो मोबाईल?

या व्यतिरिक्त शास्त्रज्ञांनी काही उपयुक्त सामान्य टिप्स देखील सांगितल्या आहेत. जेणेकरून चार्जिंगच्या सवयी आपल्या बॅटरीला दीर्घआयुष्य जगण्यास कशी मदत करू शकतात. जाणून घेवूया या टिप्स…

स्मार्टफोन वायरलेस चार्जिंग: मोबाईलच्या बॅटरी लाईफवर परिणाम होतो का? जाणून घ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

1) Battery Charging बॅटरी चार्जिंगचा 20/80 पॅटर्न 

गॅझेट्समधील लिथियम बॅटरी या पूर्णपणे डिस्चार्ज आणि रिचार्ज करण्याच्या क्षमतेसह उत्पादित केली जाते. हे सहसा 300 ते 1000 च्या दरम्यान असते. मात्र, तरीही बॅटरीचे आयुष्य दीर्घायुषी होण्यासाठी  20/80 पॅटर्न हा एक सुलभ नियम आहे. याचा अर्थ जोपर्यंत तुमची बॅटरी सुमारे 20 टक्क्यांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत चार्जिंग सुरू करू नका. अनेकांना बॅटरी 50 टक्क्यांवर आली की लगेच चार्जिंगला लावायची सवय असते. मात्र, ही चुकीची सवय आहे. बॅटरी 20 टक्क्यांपर्यंत आल्यानंतरच तुम्ही पुन्हा चार्जिंगला सुरुवात करावी, असा साधारण संकेत आहे. चार्जिंगला लावल्यावर 100 टक्के चार्ज न करता. तुम्ही 80 टक्क्यांपर्यंत पोहोचल्यावर चार्जिंग बंद करा, ही सगळ्यात आदर्श पद्धत आहे, असे केओलियन म्हणतात.

2) Battery Charging 24 X7 : चार्ज करू नका

अनेकांना आपले गॅझेट किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण चार्जिंगला लावून काम करण्याची सवय असते. त्यानंतर काम झाल्यानंतर देखिल रात्री झोपताना चार्जिंगला लावून रात्रभर चार्जिंगला ठेवण्याची सवय असते. थोडक्यात हे लोक जवळपास दिवसाचे 22 तास किंवा पूर्ण 24 तास चार्जिंग सुरु ठेवतात. हे अत्यंत चुकीचे आहे. हे टाळावे. तसेच सध्या एक चुकीची माहिती वायरल होत आहे, ती अशी की जर तुम्हाला बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्ही अधून-मधून गॅझेटची बॅटरी संपूर्ण डिस्चार्ज करा म्हणजे अगदी शून्यावर आणा आणि नंतर ती 100 टक्के चार्ज करा. हे अत्यंत चुकीचे आहे. असे पेच यांनी स्पष्ट केले. यावर पेच म्हणाले की ही पद्धत लीड-ॲसिड बॅटरीला लागू पडते. मात्र, आज बहुतांश सर्वच गॅझेट लिथियम बॅटरीवर चालतात आणि हा नियम लिथियम बॅटरीवर लागू होत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमचे डिवाईस काही काळ वापरणार नसाल तर तो चार्ज न करणेच बरा, असेही पेच म्हणाले.

3) बॅटरी जास्त गरम होऊ देऊ नका

बॅटरी जास्त उष्णतेच्या संपर्कात येणे विशेषतः वाईट आहे, जसे की उन्हाळ्याच्या दिवसात कारमध्ये. “लक्षात ठेवा, जेव्हा एखाद्या केसमध्ये बॅटरी बंद केली जाते, तेव्हा ती आणखी गरम होऊ शकते,” असे पेच म्हणतात. थंड तापमान (गोठवण्याच्या वर) तितके वाईट नसते, जरी काही उत्पादक अत्यंत थंडीत रिचार्ज न करण्याचा सल्ला देतात. Pecht म्हणतात की, ते न वापरलेल्या बॅटरी फ्रीजमध्ये ठेवतात. फक्त खात्री करा की त्या ओलाव्याच्या संपर्कात नसतील ज्यामुळे बॅटरीभोवती असणारे इलेक्ट्रॉनिक्स खराब होऊ शकते.

4)   लॅपटॉप चार्ज करण्याबद्दल जास्त वेड लावू नका

तसे पाहता गेल्या दशकात, हाय-एंड स्मार्टफोन्स आणि लॅपटॉप्ससह उत्पादनांनी चार्जिंगबाबत अधिक हुशार बनले आहे आणि वरीलपैकी काही चुका स्वयंचलितपणे प्रतिबंधित केल्या आहेत. अनेक लॅपटॉप, जे एकावेळी आठवडे डॉकिंग स्टेशनवर बसू शकतात, त्यांना आता चार्जिंग थांबवणे आणि बॅटरी 100 टक्क्यांपेक्षा कमी ठेवणे माहित आहे. असे असले तरी केओलियन म्हणतात की ते प्रत्येकवेळी अनप्लग करणे अद्याप चांगली कल्पना आहे.

iOS 13 किंवा त्यानंतरच्या आवृत्तीवर चालणाऱ्या Apple iPhones मध्ये Optimized Battery Charging नावाचे निफ्टी वैशिष्ट्य आहे. जे तुमच्या ठराविक दिनचर्येचा मागोवा घेऊ शकते आणि तुम्ही जागे होण्यापूर्वी चार्जिंग पूर्ण झाले आहे. याची खात्री करण्यासाठी आपोआप वेळ काढू शकतो आणि ते वापरणे सुरू करणे आवश्यक आहे.

5) कोणता चार्जर वापरावा?

बॅटरी संथ गतीने चार्जिंग करणे हीच गोष्ट बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी चांगले आहे. हल्ली मार्केटमध्ये गॅझेट चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जर सारखी उपकरणे आली आहे. यामुळे मोबाईल तीव्र गतीने चार्ज होतो. पण हे नेहमीच वापरणे योग्य नव्हे. क्वचित प्रसंगी तुम्हाला अति आवश्यक असल्यास असे फास्ट चार्जर वापरण्यास हरकत नाही. मात्र, नेहमी चार्जिंग करताना बॅटरी संथ गतीने चार्ज करणे तसेच शक्यतो मोबाइल सोबत आलेल्या चार्जनेच बॅटरी चार्ज करणे अधिक उपयुक्त, असे पेच आणि केरोलियन यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

Back to top button