अफगाणिस्तानातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्‍थापन - पुढारी

अफगाणिस्तानातील घडामोडींवर नजर ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्‍थापन

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: दहशतवादी संघटना तालिबानने कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानातील घडामोडींवर नजर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. अफगाणिस्तानातील घडामोडींवर नजर ठेवण्‍यासाठी स्‍थापन केलेल्‍या समितीमध्‍ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे.

अफगाणिस्तानच्या अनुषंगाने केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम काय राहणार? यावर लक्ष ठेवण्याचे निर्देश या समितीला देण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांत समितीच्या अनेक बैठका झाल्या असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

अफगाणमध्ये अजूनही अडकलेल्या भारतीय नागरिकांची सुटका करण्यास सरकारने प्राधान्य दिलेले आहे. याशिवाय भारताला मदत केलेल्या काही अफगाणी नागरिकांना आणण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

अफगाणिस्तातील प्रत्यक्ष परिस्थितीवर तसेच त्या देशाच्या अनुषंगाने येत असलेल्या जागतिक प्रतिक्रियांवर समिती लक्ष ठेवून आहे.

भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी अफगाणी जमिनीचा वापर होणार नाही ना, ही सरकारची मोठी चिंता आहे.

दोन दशकांचे अफगाणिस्तानातले युद्ध संपवून अमेरिकेने आपले तमाम सैनिक त्या देशातून परत घेतले आहे.

अमेरिकेचा शेवटचा सैनिक परतल्यानंतर काबुल विमानतळावर तालिबानने कब्जा केला आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ: महाराष्ट्राची गोधडी थेट विदेशात पोहचली |

 

Back to top button