Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांनी घेतली शपथ | पुढारी

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात ९ न्यायाधीशांनी घेतली शपथ

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) ९ न्यायाधिशांनी मंगळवारी एकाचे वेळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. सर न्यायाधीश एन. व्ही. रमना यांनी या न्यायाधीशांना शपथ दिली आहे. शपथ ग्रहण करणाऱ्या न्यायाधिशांमध्ये ३ महिला न्यायाधीशांची समावेश आहे. याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची संख्या २४ वरून ३३ झाली आहे.

वरील ९ न्यायाधीश हे वेगवेगळ्या राज्याशी संबंधित आहेत. सरन्यायाधीश रमणा यांनी सर्वप्रथम न्यायमूर्ती अभय ओक यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. शपथ घेतलेल्या अन्य न्यायमूर्तींमध्ये विक्रम नाथ, जितेंद्रकुमार माहेश्वरी, हिमा कोहली, बी. व्ही. नागरत्ना, सी. टी. रवीकुमार, एम. एम. सुंदरेश, बेला त्रिवेदी यांचा समावेश आहे.

Supreme Court

…असा रचला जाणार इतिहास

याशिवाय माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील पी. एस. नरसिंहा यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या भविष्यातील पदोन्नतीचा विचार केला तर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना या २०२७ साली सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश बनणार आहेत. तसे झाले तर त्या देशाच्या पहिल्या सरन्यायाधीश ठरतील.

कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपर्यंत (Supreme Court) प्रवास करणाऱ्या न्यायाधीश बी. व्ही. नागरत्न यांनी इतिहास रचला आहे. वरिष्ठतेच्या क्रमवारीनुसार २०२७ मध्ये देशाच्या पहिल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश त्या होणार आहेत. त्यांचा कार्यकाल हा ३६ दिवसांचा असणार आहे.

इतकंच नाही, तर पहिल्यांदाच वडील आणि मुलगी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होणार आहेत. न्यायाधीश बी. व्ही. नागरत्ना यांचे वडील  ई. एस. वेंकटरमैय्या यापूर्वी सरन्यायाधीश राहिलेले आहेत. कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच पदोन्नती झालेल्या न्यायाधीश महिला आहेत. कर्नाटकात सर्वात जास्त काळ सेवा देणाऱ्या महिला न्यायाधीश आहेत. ज्या प्रथमच देशाच्या महिला सरन्यायाधीश होणार आहेत.

पहा व्हिडीओ : जपानी मुलगी बोलतेय चक्क मराठी

Back to top button