Dahihandi : गोविंदाला दहीहंडी फुटेना, गाव शोधतोय कुंभाराला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल | पुढारी

Dahihandi : गोविंदाला दहीहंडी फुटेना, गाव शोधतोय कुंभाराला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पुढारी ऑनलाइन डेस्क : एक नव्हे दोन नव्हे तब्बल 23 वेळा नारळाने हंडी फोडण्याचे प्रयत्न केले तरी ती हंडी फुटत नाही आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच जास्त व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओवर कॅप्शन दिले आहे. हे मडकं बनवणा-या कुंभाराला सर्व गाव शोधत आहे.

दहीहंडीबाबतच्या निर्णयावर नाराजी; उत्सवाला क्रीडाप्रकाराचा दर्जा देण्याला क्रीडा संघटनांचा विरोध

शुक्रवारी ठिकठिकाणी जन्माष्टमी मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडी खूप उत्साहात रंगली. दहीहंडीच्या स्पर्धा ठिकठिकाणी घेण्यात आल्या. या व्हायरल व्हिडिओमध्ये थरावर थर रचून गोविंदा दहीहंडी फोडण्यासाठी पुढे सरसावले. शर्ट आणि जीन्स घातलेल्या माणसाने सगळ्यात वरचा थर गाठला आणि नारळ घेऊन दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 23-24 वेळा नारळाने हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. पण काही केल्या हंडी फुटली नाही. त्यानंतर दुस-या एकाच्या हातात नारळ देऊन त्याने हंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याच्याही हातून हंडी काही फुटली नाही. या व्हिडिओवर एकाने कॅप्शन दिले की हंडी बनवणा-या कुंभाराला सगळे गाव शोधत आहे, आणि व्हिडिओ व्हायरल केला.

हा व्हिडिओ जन्माष्टमीच्या मुहूर्तावर संपूर्ण देशात व्हायरल झाला असून ठिकठिकाणी ट्विटर, फेसबूक आदि सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सगळ्यांच्या टॅगलाइनमध्ये ही हंडी कोणी बनवली असेच म्हणण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी ‘दहीहंडी’ला राज्यात क्रीडाप्रकाराचा दर्जा दिला. तसेच गोविंदांना त्याअंतर्गत संरक्षण तसेच इन्शुरन्स देखिल मिळणार आहे. दही-हंडी ही एक परंपरा आहे. ज्यामध्ये भगवान कृष्णाचे भक्त ‘माखन चोरी’ किंवा लोणी चोरीची प्रसिद्ध कृती पुन्हा तयार करतात, जी परमेश्वराच्या बालपणीच्या कथांमधील अनेक खोडकर कृत्यांपैकी एक आहे.

जन्माष्टमी हिंदूंद्वारे भगवान कृष्णाच्या जन्माचे औचित्य साधून साजरी केली जाते, जो खेळकर आणि निष्पापपणाचा मूर्तिमंत देव आहे.

हे ही वाचा :

धायरी : दहीहंडीच्या उत्सवात नाचताना कोयत्याने वार; हवेत गोळीबार

पुणे : मच गया शोर सारी नगरी रे! शहर, उपनगरांत दहीहंडीचा जल्लोष

नियोजन मंडळातून जिल्ह्याला दहीहंडीसाठी 10 लाख निधी : राजेश क्षीरसागर

 

Back to top button