राज्‍यभरात उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन; मुख्यमंत्र्यांचे आवाहन | पुढारी

राज्‍यभरात उद्या सकाळी ११ वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, पुढारी ऑनलाईल : राज्यात उद्या (दि. १७) बुधवारी सकाळी ११ वाजता सामूहिकपणे राष्ट्रगीताचे गायन होणार आहे. यासाठी नागरिकांनी ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सध्या “स्वराज्य महोत्सवाचे” आयोजन सुरू असून या महोत्सवाअंतर्गत हे सामूहिक राष्ट्रगीत गायन राबवण्यात आले आहे.

या सामूहिक उपक्रमात राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सहभागी व्हावे आणि नवा विक्रम नोंदवावा असे शिंदे म्‍हणाले. हा उपक्रम प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी असेही निर्देश त्यांनी दिली.

राज्यात या उपक्रमाची अंमलबजावणी होण्यासाठी सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती राज्याचे मुख्य सचिव मनू कुमार श्रीवास्तव यांनी दिली. राज्य शासनाने सामूहिक राष्ट्रगीत गायना या बाबत शासनाकडून सविस्तर निर्णय जारी करण्यात आला आहे. तसेच सांस्कृतीक कार्य मंत्रालयाच्यावतीने यासंबंधी परिपत्रक जारी केले आहे.

देशभक्ती, देशप्रेम आणि आपली उज्वल परंपरा जपण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सरकारकडून राबवले जात आहेत. तसेच लोकांच्या मनात आपला राष्ट्रध्वज व आपले राष्ट्रगीत याविषयीची पवित्र भावना तर आहेच. आणि याच पवित्र भावनेला सामूहिक या उपक्रमाच्या माध्यमातून जगा समोर आणायचे आहे.

या उपक्रामासंदर्भांत सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, खाजगी, शासकीय सर्व शैक्षणिक संस्था मधील विद्यार्थी, व्यापारी, सेवा पुरवठादार, शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच राज्यातील इतर सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे. आणि आपण ज्या ठिकाणी असात त्‍याच ठिकाणी राष्ट्रगीताचा मान सन्मान राखून यामध्ये सहभागी व्हावे.असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

वांगी आहारात हवीच – वजन कमी करण्यासाठी ते मेंदूच्या आरोग्यसाठी उपयुक्त 

India @ 75 : तिरंग्यासोबत सेल्फी, पहा फोटो 

India @ 75 : तिरंग्यासोबत सेल्फी, पहा फोटो

Back to top button