विरोधी पक्षाने आमच्या सरकारची चिंता करू नये; स्‍वतःची एकजूट पहावी : देवेंद्र फडणवीस | पुढारी

विरोधी पक्षाने आमच्या सरकारची चिंता करू नये; स्‍वतःची एकजूट पहावी : देवेंद्र फडणवीस

मुंबई, पुढारी ऑनलाईन : राज्‍याचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने विरोधी पक्षांवर टिकास्‍त्र सोडले. अधिवेशनाच्या आधी विरोधी पक्षाने चहापानावर नेहमीप्रमाणे बहिष्‍कार टाकला आहे. गेल्‍या दिड महिन्यापासून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत, हे विरोधी पक्षाला विसर पडला आहे. तर ते आता आमच्याकडून अनेक अपेक्षा व्यक्‍त करत आहेत. आणि आम्‍ही ते पूर्ण करू असे फडणविस म्‍हणाले.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, विरोधी पक्षाने आमच्या सरकारची चिंता करू नये. आमच्यापेक्षा विरोधी पक्षांने स्‍वतःची एकजूट पहावी. तीन पक्षाचे सरकार तीन दिशा झालेत. काँग्रेसने तर यावर प्रश्न उपस्‍थित केला आहे. तसेच आमचे सरकार आल्‍यापासून मंत्रालय भरून , फुलुन आले आहे. लोकांची गर्दी दिसून येत आहे. आणि लोकांची कामे होत आहेत.

तसेच, विरोधकांचा आमच्यावर जास्‍त विश्वास आहे, असे दिसून येते. मविआच्या काळात शेतक-यांना 9-9 महिने मदत केली नाही. आम्‍ही आतापर्यंत 95 टक्‍के मदत केली आहे. आणि नैसर्गिक आपत्‍तीमध्ये आमचे हे सरकार लोकांपर्यंत पोहचले आहे.
कामे करत असताना जनतेच्या हितीचे जे आहे ते करत आहोत मग ते कोठे आहे आणि कोणत्‍या पक्षात आहे हे या सरकारने कधीच पाहिले नाही. असे फडणविस म्‍हणाले.

40 दिवसांत 750 विविध निर्णय  

आमचे सरकार आल्‍यापासून 40 दिवसांत 750 विविध निर्णय घेतले आहेत. असे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सांगत चित्रपटाचा दाखला दिला. तर आम्‍ही कुठे आहोत असा सवालही उपस्‍थित करण्यात आला. आम्‍ही जागेवरच आहोत असा टोल एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षाला लगावला.

पुढे बोलताना ते म्‍हणाले, आपण तळागाळात काम करणारे आहोत. निर्सगाने आमच्या सरकारला साथ दिली आहे. विरोधी पक्ष नेते पूर ओसरल्‍यावर बांधावर पोहचले आहेत. असा आरोप केला. राज्‍यात आता सर्वसामान्यांच सरकार आले आहे. आत्‍यावश्यक कामांना स्‍थगिती देण्यात आली नाही. जलसंधारणासाठी 5.5 हजार कोटींचा निधी उपलब्‍ध करून दिली.

उध्दव ठाकरे यांनी राजीनामा दिल्‍यारनंतरचे निर्णय थांबवले नाहीत. ते आम्‍ही पूर्ण करत आहोत, तर आमचे सरकार जनतेला पटले म्‍हणून आम्‍हाला मोठया प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे, असे शिंदे म्‍हणाले.

हेही वाचा  

Back to top button