मासिक पाळीतील आराेग्‍य : 'या' देशात मिळणार सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स... फ्री... | पुढारी

मासिक पाळीतील आराेग्‍य : 'या' देशात मिळणार सॅनिटरी पॅड, टॅम्पून्स... फ्री...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रत्येक देशात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळे निर्णय घेतले जातात. पण तुम्हाला माहित आहे का?  ‍ देशाने महिला आरोग्य संबंधित घेतलेल्या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे. तो देश म्हणजे स्कॉटलॅंड. हा देश महिलांना मासिक पाळी (Menstrual Period) दरम्यान लागणारी उत्पादने (Menstrual Product Free) विनामूल्य देणार आहे. या निर्णयाचे जगभर कौतुक होत आहे.

Menstrual products Free
Menstrual products Free

आता स्कॉटलॅंड देशात महिलांना मासिक पाळी दरम्यान जी उत्पादने लागतात ती आता मोफत (Menstrual products Free) मिळणार आहेत.  असा निर्णय घेणारा स्कॉटलॅंड  हा जगातील पहिला देश ठरला आहे. हा कायदा  १५ ऑगस्टपासून  लागू झाला आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये स्कॉटिश खासदारांनी पीरियड प्रोडक्ट्स विधेयक एकमताने मंजूर केले होते. या निर्णयाचे जगभरातून कौतुक झाले होते.

स्कॉटलंडच्या या नव्या कायद्यानुसार (Menstrual Product Free) स्कॉटलंडमधील शाळा आणि विद्यापीठांसह सार्वजनिक इमारतींमध्ये मासिक पाळी दरम्यान लागणारी उत्पादने उपलब्ध केली जाणार आहेत. उत्पादने विनामूल्य उपलब्ध असणार आहेत. उत्पादनासंबंधी लोकांना खात्री करणे ही स्थानिक अधिकारी आणि शिक्षण पुरवठादारांची जबाबदारी असेल.

हेही वाचलंत का?

Back to top button