विनायकराव मेटेंच्या अकस्मात जाण्याने समाजाचे मोठे नुकसान - संभाजीराजे छत्रपती | पुढारी

विनायकराव मेटेंच्या अकस्मात जाण्याने समाजाचे मोठे नुकसान - संभाजीराजे छत्रपती

पुढारी ऑनलाइन डेस्क : शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सतत झटणारा नेता आज काळाने हिरावून घेतला. विनायकराव मेटेंच्या अकस्मात जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. भावपूर्ण श्रध्दांजली ! अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटरवर दिली आहे.

दरम्यान, संभाजीराजे हे एमजीएम रुग्णालयात पोहोचले आहेत. त्यांनी दुर्बलांसाठी झटणारा नेता हरपला, असे भावना व्यक्त केली आहे. तसेच मेटे हे आपले खूप चांगले मित्र होते असे त्यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणासह अनेक वेगवेगळ्या प्रश्नांवर आमची सतत चर्चा व्हायची, असे त्यांनी म्हटले आहे.

विनायक मेटे यांचे निधन अतिशय धक्कादायक असून त्यांच्या जाण्याने लोकांचा नेता हरपला, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ट्विटरवरून त्यांनी मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिली.

Back to top button