संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणे यांचा इशारा | पुढारी

संजय राऊत यांचा करेक्ट कार्यक्रम करू; निलेश राणे यांचा इशारा

सिंधुदुर्ग, पुढारी ऑनलाईन: शिवसेना खासदार संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी दिला आहे. राणे यांची तब्येत बरी नसते त्यामुळे त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांची काळजी घ्यावी, अशी उपरोधिक टीका राऊत यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर निलेश यांनी इशारा दिला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांचे सुरू झालेले वाकयुद्ध सुरूच आहे. ‘संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू,’ असा इशारा नीलेश यांनी दिला आहे.

नाशिक येथे एका कार्यक्रमात बोतलाना राऊत म्हणाले, ‘कार्यक्रम करण्याची शिवसेनेला सवय आहे. राज्यात प्रदीर्घ काळ शिवसेनेचाच मुख्यमंत्री राहील.

महाराष्ट्रासारखे राज्य आपल्या हाती असल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे. त्यांनी आमच्याकडे यावे आम्ही उपचार करू.

ठाकरेंच्या रक्तातच समाजकारण, राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड काय चर्चा झाली, हे सांगण्याची गरज नाही.

शिवसेनेचे भाजपशी वैचारिक मतभेद आहेत, वैर नाही. परंतु, राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा कोणी प्रयत्न करू नये.

कारण आमच्याकडे राजकारणातून उचलायला खांदे आणि हात कमी नाहीत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांनी शहाण्यासारख्या जनआशीर्वाद यात्रा काढल्या.

मात्र एक अतिशहाणा ऊठसूठ ठाकरे, महाविकास आघाडीवर टीका करत आहे.’

याचा संदर्भ घेत माजी खासदार नीलेश राणे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय?, संजय राऊत हा बोगस माणूस आहे.

जिथे दिसेल तिथे कार्यक्रम

आम्ही जिथे दिसेल तिथे त्यांचा कार्यक्रम करू. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जनआशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच.

शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत. केवळ शिवसेना अडवा अडवीची कामे करत आहे. आम्ही त्यांना काडीचीही किंमत देत नाही.

संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभे रहावे आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे.’ असा इशाराही दिला आहे.

हेही वाचा: 

Back to top button