Nude Photoshop : ‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी रणवीर सिंहला समन्स | पुढारी

Nude Photoshop : ‘न्यूड फोटोशूट’प्रकरणी रणवीर सिंहला समन्स

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंहला न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) प्रकरणी चेंबूर पोलिसांनी  समन्स बजावले आहे. समन्सअंतर्गत येत्या २२ ऑगस्ट रोजी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश रणवीरला देण्यात आले आहेत. न्यूड फोटोशूटमुळे तो सद्या खूप चर्चेत आहे. त्याच्या या फोटोशूटवर नेटक-यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

Complaint agaist ranveer
Complaint agaist ranveer
रणवीर सिंह हा नेहमी चर्चेत असणारा अभिनेता. कधी आपल्या अभिनयाने तर कधी आपल्या हटके फॅशनमुळे चर्चेत असतो.  न्यूड फोटोशूट प्रकरणी त्याच्या विरुद्ध चेंबूर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली होती. रणवीरवर भारतीय दंड विधानाच्या कलम ५०९, २९२, तसेच २९४ कलमांतर्गत तसेच आयटी अ‍ॅक्टच्या कलम ६७ ए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समन्स अंतर्गत त्याला  २२ ऑगस्टला हजर राहण्यास सांगितले गेले आहे.
 
Nude Photoshoot: काय आहे प्रकरण 
रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी  पेपर’ या इंग्रजी मासिकासाठी न्यूड फोटोशूट केले होते. या फोटोशूटनंतर तो बराच चर्चेत आला आहे. त्याच्या या फोटोंवर सोशल मीडियावर संमिश्र भावना येत आहेत. काहींनी पाठिंबा तर काहींनी त्याच्यावर टिका केली होती. याप्रकरणी त्याच्यावर पोलिसात तक्रारही दाखल झाली आहे.
हेही वाचलतं का? 

Back to top button