दरेगाव तलावात तिघांचा बुडून मृत्यू | पुढारी

दरेगाव तलावात तिघांचा बुडून मृत्यू

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : दोन दिवसांपुर्वी दोघे दुचाकीस्वार मोसम नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी (दि.१२) दरेगाव शिवारातील खाडीत तिघे तरुण बुडाल्याची घटना घडली.

काही तरुण दरेगाव शिवारातील उद्यान परिसरात फिरायला गेले होते. या भागात मोठ्या प्रमाणात उत्खननाने खड्डे होऊन त्याला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यात पोहण्याचा मोह तरुणांच्या जीवावर बेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ४०- ५० फूट खोल तलावात मोहम्मद नुमान सलमान झिया (वय १६, रा. अबुजार गफारी मशिदीजवळ), महफुजुर रहमान अतिक अहमद अन्सारी (वय १२) आणि मोहंमद शाकीर साजिद अहमद (वय १४) हे मुलं बुडाल्याचे सांगण्यात येत आहे.

मनपा अग्निशमन दलाचे कर्मचारी शकील अहमद आणि किल्ला तैराक गृपच्या सदस्यांनी दोन मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. तिसऱ्या बालकाचा जाळे टाकून शोध घेण्यात आला. मृतदेह सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. याठिकाणी नागरिकांनी गर्दी केली होती. पवारवाडी पोलिस ठाण्यात नोंद होण्याची प्रक्रिया सुरू होती.

हे वाचलंत का?

Back to top button