कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर ! राजू श्रीवास्तवसोबत त्यांचा भाऊ ही AIIMS मध्ये ॲडमिट | पुढारी

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर ! राजू श्रीवास्तवसोबत त्यांचा भाऊ ही AIIMS मध्ये ॲडमिट

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडी विश्वाला धक्का देणारी घटना नुकतीच घडली. कॉमेडीच्या दुनियेत स्वत:चं स्थान निर्माण करणारा राजू श्रीवास्तवबाबत चाहत्यांसाठी चिंता वाढवणारी बातमी समोर आली. दुनियेला सतत हसवत ठेवणारा हास्य कलाकार राजू श्रीवास्तव सध्या अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देतो आहे. हार्ट अटॅकनंतर राजू श्रीवास्तव यांना एम्समध्ये भरती केलं आहे. त्यांची प्रकृती गंभीर असून गेले अनेक तास त्यांना शुद्ध आलेली नाही असं त्यांच्या जवळच्या मित्राने सांगितलं आहे.

यासोबतच श्रीवास्तव कुटुंबाला धक्का देणारी दुसरी गोष्टही घडली आहे. राजू यांचे छोटे भाऊ काजू श्रीवास्तव देखील AIIMS मध्ये ॲडमिट आहे. या गोष्टीची माहिती राजू यांचे पीआरओ गर्वित नारंग यांनी दिली आहे. राजू यांच्या भावाच्या कानाखाली गाठ होती. त्याचं ऑपरेशन झाल्यापासून ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. गेले तीन दिवस ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. त्यामुळे त्यांना राजू यांच्या प्रकृतीविषयी कोणतीच माहिती दिली गेली नाही.

 

राजू उत्तर प्रदेशच्या फिल्म विकास परिषदेच्या अध्यक्षस्थानी भूषवत आहेत. 2012 पासून काही काळ समाजवादी पार्टीसोबत राहिल्यानंतर राजनाथ सिंग यांच्या मदतीने त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.  यानंतर मोदी सरकारच्या स्वच्छता अभियानाचे ते ब्रॅंड ॲम्बेसेडरही बनले. याशिवाय भारतीय जनता पार्टीचे उत्तर प्रदेशातील स्टार प्रचारक म्हणूनही त्यांचा चेहरा समोर आला होता. राजू आणि त्यांचा भाऊ काजू यांच्या एकाचवेळी हॉस्पिटलाईज्ड होण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Back to top button