Surgery on Shoaib Akhtar : शोएब अख्तर याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया | पुढारी

Surgery on Shoaib Akhtar : शोएब अख्तर याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर ऑस्ट्रेलियातील एका रुग्णालयात दाखल असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शोएब अख्तरवर गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रावर एक व्हिडिओ शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. (Surgery on Shoaib Akhtar)

शोएब अख्तर या व्हिडिओमध्ये म्हणाला की, माझ्यावर गेल्या ५-६ तासांपासून शस्त्रक्रिया सुरू होती. सध्या मला प्रचंड वेदना होत आहेत. निवृत्तीच्या ११ वर्षानंतरही मला गुडघ्याचा त्रास होत आहे, मी ४-५ वर्षे अजून क्रिकेट खेळू शकलो असतो. मला माहिती होते की, असे केले तर मला व्हीलचेअरवर बसावे लागेल. पण, मी जे काही केले ते पाकिस्तान क्रिकेट संघासाठी केले आहे, मला संधी मिळाली तर मी संघासाठी अजून बरचं काही करेन. (Surgery on Shoaib Akhtar)

शोएब अख्तरने यापुर्वीही बऱ्याचवेळा गुडघ्याच्या आजाराविषयी भावना व्यक्त केल्या आहेत. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर शोएब अख्तर युट्यूब चॅनेलवर सक्रिय आहे. तसेच अनेक सामन्यांचे समालोचनही त्याने केले आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शोएबने ४६ कसोटी सामन्यांमध्ये १७८ बळी घेतले आहेत. तर १६३ एकदिवसीय सामन्यांत २४७ विकेट्स पटकावल्या आहेत.

शोएब अख्तरने २२४ सामन्यांमध्ये पाकिस्तानचे नेतृत्व केले आहे. शोएबच्या नावावर एकूण ४४४ आंतरराष्ट्रीय विकेट असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. शोएबने 2002 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध161.3 च्या वेगाने गोलंदाजी करत सर्वांत वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shoaib Akhtar (@imshoaibakhtar)

हेही वाचलंत का?

Back to top button