संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी | पुढारी

संजय राऊत यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्‍यात आलेले शिवसेना नेते व खासदार संजय राऊत 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. ऑर्थर रोड कारागृहात संजय राऊत यांची रवानगी करण्यात येणार. न्यायालयीन कोठडीमुळे राऊत यांच्या जामीनाचा मार्ग आता मोकळा झाला.

मोठी बातमी : संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

पत्राचार पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी विशेष न्यायालयाने सुनवावली होती. त्यानंतर ईडीकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. 4 ऑगस्टला ईडी कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीच्या अधिका-यांनी संजय राऊत चौकशीला सहकार्य करत नाही. असा ठपका ठेवत प्रकरणाशी संबंधित असलेल्यांना समन्स बजावला आहे. त्यांची समोरासमोर चौकशी करणे गजरेचे आहे. त्यांची 6 ऑगस्टला चौकशी होणार आहे, असे सांगत राऊत यांना आणखी 10 ऑगस्टपर्यंतची ईडी कोठडी मिळावी, अशी मागणी केली. तर राजकीय सूड बुद्धीतून ही कारवाई करण्यात येत आहे, राऊत यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, असा युक्तिवाद राऊत यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता.

दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत 8 ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. आज ही मुदत संपत आहे. त्यामुळे राऊत यांना पुन्हा एकदा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्यांना 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली असून आता त्यांची रवानगी ऑर्थर रोड कारागृहात केली जाणार आहे.

दरम्यान, 6 ऑगस्टला राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडी कार्यालयाकडून कसून चौकशी करण्यात आली. या संबंधित सविस्तर माहिती आपण खालील बातमीत वाचू शकता.

ईडीकडून वर्षा राऊत यांची 7 तास चौकशी

सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पात सुमारे ०१ हजार ३४ कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. याप्रकरणी मनी लॉंड्रिंग कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ईडी तपास करत आहे. पत्राचाळ पुनर्विकासाच्या पहिल्या टप्प्यांत संजय राऊत यांचे नीकटवर्तीय असलेल्या प्रवीण राऊत यांची गुरू आशीष कन्स्ट्रक्शन कंपनी सहभागी होती. पुढे ही कंपनी त्यातून बाहेर पडली. मात्र, या व्यवहारात कंपनीला मोठा फायदा झाला होता. प्रवीण राऊत यांना या व्यवहारात मिळालेल्या पैशांतील काही पैसे संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात वळविण्यात आल्याचा आरोप आहे. (Sanjay Raut ED custody)

घोटाळ्यातील पैशांतून वर्षा राऊत यांच्या नावाने दादर येथील फ्लॅट आणि अलिबाग येथील किहीम येथे भूखंडांची खरेदी करण्यात आल्याचा ठपका ठेवत ईडीने अशा ११.१५ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई केली आहे. याच अनुषंगाने ईडीने राऊत यांची यापूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर ईडीने जुलै महिन्यात पुन्हा एकदा चार वेळा चौकशीसाठी समन्स जारी केले होते. यातील एका वेळी राऊत हे चौकशीला हजर राहिले. मात्र, अन्य समन्सला ते अनुपस्थित राहिले. अखेर ईडीने राऊत हे चौकशीला हजर न राहून सहकार्य करत नसल्याची नोंद करत रविवारी सकाळी राऊतत्यांच्या घरी छापेमारी केली होती.

Back to top button