धक्कादायक : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या अंत्यविधीला गेलेल्या भावाचा सर्पदंशाने मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : सर्पदंशाने मृत्यू झालेल्या आपल्या भावाच्या अंत्यविधीला गेलेल्या व्यक्तीलाही सर्पदंश झाल्याने त्याचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल (दि. ४) उत्तर प्रदेशातील भवानीपूर येथे घडली आहे.
याबद्दल मंडळ अधिकारी राधा रमण सिंह आणि पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भवानीपूर गावातील अरविंद मिश्रा (३८) यांचा मंगळवारी (दि. २) सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यविधीला त्यांचा भाऊ गोविंद मिश्रा (२२) लुधियानावरून आला. बुधवारी (दि.३) गोविंद झोपले असताना सर्पदंश झाला. याचवेळी त्यांच्यासोबत लुधियानावरून आलेल्या पांडे नामक व्यक्तीलाही सर्पदंश झाला. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण दुर्दैवाने गोविंद यांचा मृत्यू झाला तर पांडे यांची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.
या शोकांतिकेने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात असतानाच घडलेल्या योगायोगाबद्दलही चर्चा सुरु आहे. दरम्यान, वरिष्ठ वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गुरुवारी गावाला भेट दिली. तसेच स्थानिक आमदार कैलाशनाथ शुक्ला यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन मदतीचे आश्वासन दिले.
हे वाचलंत का?
- पुणे : सर्पदंशानंतर डॉक्टरांनी वाचविले रुग्णाचे प्राण
- सर्पदंशामुळे शुद्ध हरपलेला तरुण 12 दिवसांनंतर ठणठणीत ; सीपीआरच्या वैद्यकीय पथकाने घेतले परिश्रम
- पिंपरी : पाच महिन्यांत 55 जणांना सर्पदंश