मोहोळ अपघात : लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार एक जखमी | पुढारी

मोहोळ अपघात : लक्झरी बसची दुचाकीला धडक; एक ठार एक जखमी

मोहोळ पुढारी वृत्तसेवा : (मोहोळ अपघात) भरधाव वेगातील लक्झरी बसने डबल सीट दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर पाठीमागे बसलेला लहान मुलगा किरकोळ जखमी झाला. हा अपघात २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ शहरातील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीजवळ घडला.

(सचिन बाबुराव देशमाने, वय ३९ वर्षे रा. मोहोळ) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सचिन देशमाने यांचे मुळगाव बामणी ता. तुळजापूर आहे.

सध्या ते मोहोळ शहरात राहण्यास असून चंद्रमौळी औद्योगिक वसाहत येथे चालक म्हणून काम करतात. २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ते त्यांचा मुलगा पृथ्वीराज सचिन देशमाने यांच्यासह दुचाकीने (क्र. एम.एच. २५, ए.सी. ९०१४) कंपनीकडे निघाले होते.

सिग्नल चौकातून कंपनी कडे वळत असताना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या लक्झरी बसने (क्र. एम.एच. १२ क्यू.जी. ९०१६) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने सचिन देशमाने ते जागीच ठार झाले तर मुलगा पृथ्वीराज किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर चालकाने बस जागेवर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.

या प्रकरणी पांडुरंग देशमाने यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून लक्झरी बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अविनाश शिंदे हे करीत आहेत. या घटनेमुळे मोहोळ व बामणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचलत का :

अभिनेता संतोष जुवेकरचं फेसबुक अकाऊंट हॅक

Back to top button