संजय राऊतांचा नारायण राणेंवर पलटवार..

मुंबई ;पुढारी ऑनलाईन: केवळ पोकळ बडबडून काही होत नाही. आमच्‍या अंगावर याला तर याद राखा ही शिवसेना आहे, कुणाच्‍या बोलण्‍यानं आमच्‍या फुग्‍याला भोक पडणार नाही. आम्‍ही विरोधकांना घाबरत नाही, अशा शब्‍दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना प्रत्‍युत्तर दिले. विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्‍याचे प्रयत्‍न करावेत, असे आव्‍हानही संजय राऊत यांनी दिली.

भाजपच्‍या जनआर्शीवाद यात्रेवेळी आक्षेपार्ह विधान केल्‍याप्रकरणी नारायण राणे यांना अटक करण्‍यात आली होती. यानंतर महाड न्‍यायालयाने त्‍यांना जामीन मंजूर केला. यानंतर बुधवारी राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत शिवसेनेला आव्‍हान दिले होते.

आम्‍ही टीकेला घाबरत नाही. कर नाही त्‍याला डर कसली, असा सवालही त्‍यांनी केला. राणेंनी आपल्‍या खात्‍याचा विकास करावा, नसते उद्‍योग करु नयेत, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

राजकीय हिंसाचाराचा आरोप करत पश्‍चिम बंगला राज्‍याचा भाजपकडून अपमान सुरु आहे. सुडाच्‍या कारवाईची व्‍याख्‍या बदलली पाहिजे असे सांगत विरोधकांनी सरकार पाडण्‍याचे प्रयत्‍न करावेत, असे आव्‍हानही त्‍यांनी दिले.

कोणी टीका करत असेल तर त्‍याला उत्तर दिलेच पाहिजे असे नाही. आमच्‍याकडे कामं आहेत, असाही टोला राऊत यांनी  लगावला.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ :शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात नेमका वाद काय?

https://www.youtube.com/watch?v=-tLggxFqaDs&t=7s

 

Exit mobile version