पुणे : नानापेठ परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून | पुढारी

पुणे : नानापेठ परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून खून

पुणे; पुढारी वृत्तसेवा: नानापेठ परिसरात तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. ही घटना २५ जुलैला रात्री एक वाजण्याच्या सुमारास पुण्यातील नानापेठ परिसरातील नवा वाडा येथे घडली आहे.

अक्षय वल्लाळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. अक्षयच्या डोक्यात दगड आणि चाकूने भोसकून खून करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच समर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Back to top button