CIA : अमेरिकेच्या गुप्तहेर प्रमुखाची तालिबान्यांशी गुप्त बैठक  | पुढारी

CIA : अमेरिकेच्या गुप्तहेर प्रमुखाची तालिबान्यांशी गुप्त बैठक 

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे (CIA) प्रमुख विल्युम जे बर्न्स यांनी २३ ऑगस्टला तालिबानचा वरिष्ठ नेता मुल्ला गनी बरादरची भेट घेतली. ही महत्वपूर्ण बैठक अफगाणिस्तानच्या राजधानीत म्हणजेच काबूल येथे घेण्यात आली. अमेरिकेतील अधिकाऱ्यांची नावे न छापण्याच्या अटीवर वाॅशिंग्टन पोस्टने ही माहिती दिली आहे.

जेव्हा अमेरिका अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या आपल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्याच्या प्रयत्नात आहे, अशा परिस्थितीत तालिबान्यांचे पदाधिकारी आणि अमेरिकेचे गुप्तचर विभागाचे अधिकारी (CIA) यांच्यात ही बैठक झालेली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी असं म्हंटलं आहे की, हे रेस्क्यू मिशन सर्वात मोठं आणि सर्वात कठीण आहे. अशात अमेरिकेचे समजले जाणारे गुप्तहेर काबूलला पाठविल्यामुळे विविध तर्क-वितर्क मांडले जात आहेत.
तालिबाने अमेरिकेला दिली खुली धमकी
काबूल विमानतळ अमेरिकेन सैनिकांच्या वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे तालिबान्यांनी अमेरिकेला खुली धमकी दिली आहे. तालिबान संघटनेचा प्रवक्ता सोहेल शाहीन सोमवारी म्हणाला की, अमेरिकेने आपलं सैनिक माघारी बोलविण्यात वेळ करत असेल, तर त्याचे भयंकर परिणाम भोगोवे लागतील. ३१ ऑगस्टपर्यंत अमेरिकेने सैनिक परत बोलवले नाही, तर त्याचे परिणाम अमेरिकेला भोगावे लागतील.
मोठ्या प्रमाणात लोक देश सोडून जाताहेत

१५ ऑगस्टनंतर अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी वर्चस्व स्थापन केल्यानंतर परिस्थिती बिघडत चालली आहे. मोठ्या प्रमाणात लोक देश सोडून जात आहेत. त्याशिवाय काबूल विमानतळावर आपापल्या देशाकडे परतण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात जमत आहेत. या विमानतळावर लोकांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचे सैनिक तैनात आहेत.

अमेरिकेच्या सैनिकांच्या म्हणण्यानुसार काबूल विमानतळावरून वेगवेगळ्या देशांमध्ये विमानांचं उड्डाण होत आहे. ४०० हून जास्त भारतीय नागरिक अफगाणिस्तानमधून भारतात परतले आहे. असं असूनही मोठ्या प्रमाणात काबूल विमानतळावर लोक अडकून पडलेले आहेत.

पहा व्हिडीओ : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button