संगमेश्‍वरमधील जनआर्शीवाद यात्रेत राणे म्‍हणाले...

जनआशीर्वाद

रत्‍नागिरी : पुढारी ऑनलाईन; पुढील काही दिवसांमध्‍ये शिवसेना सत्तेत नसेल, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. संगमेश्‍वर येथील जनआर्शीवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी यावेळी शिवसेनेकांनी राणे यांच्‍याविरोधात जोरदार घोषणबाजी केली. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जनआर्शीवाद यात्रेवेळी शिवसैना आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने

संगमेश्‍वर येथे राणे यांची जनआर्शीवाद यात्रेनिमित्त दाखल झाले. यावेळी शिवसेनेकांनी राणे यांच्‍याविरोधात जोरदार घोषणबाजी केली. जनआर्शीवाद यात्रेत बोलताना राणे म्‍हणाले की, पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवारावे. मी माझ्‍या कार्यकर्त्यांना सांगितले तर शिवसेनेची पळता भुई थोडी होईल, असे आव्‍हानही त्‍यांनी दिले.

कोकणात नवे उद्‍योग सुरु करण्‍यासाठी प्रयत्‍नशील असल्‍याची ग्‍वाहीही त्‍यांनी दिली.आमची जनआर्शीवाद यात्रा सुरुळीत सुरु आहे. भर दुपारी या यात्रेला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. याबद्‍दल त्‍यांचे आभार असेही राणे यांनी नमूद केले.

संगमेश्‍वरात कडेकोट पोलिस बंदोबस्‍त

राणे यांच्‍या जनआर्शीवाद यात्रेनिमित्त संगमेश्‍वरमध्‍ये कडेकोट पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

राणेंविरोधात शिवसैनिकांनी घोषणा दिल्‍याने येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

जनआर्शीवाद यात्रेवेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने-सामने आले.

हेही वाचले का? 

Exit mobile version