महाराष्ट्रात महाविकास आघाडीच अस्‍तित्‍व दिसत नाही : आशिष शेलार  | पुढारी

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच अस्‍तित्‍व दिसत नाही : आशिष शेलार 

पुढारी ऑनलाईन डेस्क :  महाराष्ट्रात महाविकास आघाडीच अत्वित्व महाराष्ट्रात दिसत नाही. द्रौपदी मुर्मू राष्‍ट्रीय लाोकशाही आघाडीच्या ( एनडीए ) उमेदवार आहेत. त्यांचा विजय निश्चित आहे. असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

आज (दि. १८)  राष्ट्रपतीपदासाठी (Presidential Election 2022) आज मतदान होत आहे. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यात लढत होईल. विरोधी गोटातील अनेक राजकीय पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दिलेला असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.

‘मविआ’ ची काही मते आम्हाला मिळणार : आशिष शेलार 

या वेळी आशिष शेलार म्‍हणाले की,  “द्रौपदी मुर्मू या ‘एनडीए’च्या उमेदवार आहेत. त्यांचा विजय हा निश्चित आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच अस्‍तित्‍वच दिसत नाही. ‘मविआ’ ची काही मते आम्हाला मिळणार आहेत. एनडीएच्या उमेदवारास मोठ्या संख्येनं मतदान होईल. तो आणखी एक राजकीय इतिहास ठरणार आहे. राज्यसभा, विधानसभा निवडणूकीत काय झालं ते राज्याने पाहिलं आहे. द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा निश्चीत आहे.”

कॉंग्रेसला आमदार सांभाळता येत नाहीत: चंद्रकांत पाटील 

कॉंग्रेसला आमदार सांभाळता येत नाहीत, असा आरोप भाजपा नेते व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कॉंग्रेस पक्षावर माध्यमांशी बोलताना केला. राष्टपती पदासाठी निवडणूक होत आहे. आता फक्त औपचारिकता आहे. द्रौपदी मुर्मू यांचा विजय हा निश्चित आहे.  देशभरातून ७० टक्के पेक्षा जास्त मते  द्रौपदी यांना मिळतील. असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचलंत का?

Back to top button