#सलमान खान ला विमानतळावर अडविणारा अधिकारी अडचणीत | पुढारी

#सलमान खान ला विमानतळावर अडविणारा अधिकारी अडचणीत

मुंबई, पुढारी ऑनलाईन: तपासणीशिवाय विमानतळावर प्रवेश करणाऱ्या #सलमान खान याला अडविणाऱ्या सीआयएसएफचे एएसआय सोमनाथ मोहंती यांचा मोबाइल जप्त केला आहे. सलमानला अडविल्यानंतर त्यांनी मीडियाशी वार्तालाप केल्याबद्दल ही कारवाई केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

सलमान खान आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी रशियाला रवाना होण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचला होता.

त्यावेळी त्याला छायाचित्रकार आणि चाहत्यांनी गराडा घातला. त्यामुळे मोठी गर्दी झाली. सलमान कोणतीही तपासणी न करता विमानतळावर जात होता.

त्यावेळी त्याला एएसआय सोमनाथ मोहंती यांनी अडविले. संपूर्ण तपासणी होईपर्यंत सलमानला विमानतळाच्या दारात उभे रहावे लागले.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. चोखपणे कर्तव्य बजावणाऱ्या मोहंती यांचे प्रचंड कौतुक होत आहे.

असे असताना सीआयएसएफने कारवाई करत मोबाइल जप्त केला आहे.

सीआयएसएफने कारवाई करत मोहंती यांचा मोबाईल जप्त केला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहंती यांनी प्रोटोकॉल तोडला आहे.

यापुढे ते मीडियाशी अधिक बोलू नयेत यासाठी त्यांचा मोबाईल जप्त केला आहे.

‘टायगर ३’ या चित्रपटात सलमान खानने रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात कतरिना कैफ आयएसआयची एजंट बनली आहे.

#सलमान खान विमानतळावर आल्यानंतर त्याने कोणतीही तपासणी केली नाही. छायाचित्रकार आणि चाहत्यांनी गराडा घातल्यानंतर तो पोज देत होता. त्यामुळे त्याला मोहंती यांनी अडविले. मोहंती यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. सोशल मीडियात त्याचे प्रचंड कौतुक झाले.

हेही वाचा: 

Back to top button