अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीला भोसकले | पुढारी

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीला भोसकले

पुणे : पुढारी वृत्तसेवा

अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खून केला. ही घटना सोमवारी (दि.23) पहाटे पाचच्या सुमारास वाघोली येथील बी.जे.एस कॉलेज समोरील मॅजेस्टिक सोसायटीच्या लेबर कँम्पमध्ये घडली. अनु राजू मिर्झा (वय.28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी, पोलिसांनी पती राजू पुनाराम मिर्झा (वय.30,रा. कांचन हॉटेल खांदवेनगर वाघोली) याला अटक केली आहे. याबाबत राजेश मिर्झा (वय.22,रा. वाघोली लेबर कॅम्प) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजु मिर्झा याच्या विरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजु व खून झालेली महिला अनु हे दोघे पती-पत्नी आहेत. दोघेही बांधकामावर मजूर म्हणून काम करतात. यापुर्वी दोघे मोशी येथे राहत होते. मात्र राजू हा अनु हिला सतत मारहाण करत होता. त्यातूनच ती काही दिवसापुर्वी फिर्यादी दिर राजेश मिर्झा याच्याकडे वाघोली येथील लेबर कॅम्पमध्ये राहण्यास आली होती. त्यामुळे पती राजु पत्नीवर चिडून होता.

रविवारी पहाटे अनु ही लेबर कॅम्पमधील पत्र्याच्या खोलीत झोपली होती. त्यावेळी राजू हा तेथे आला. त्याने दरवाजा वाजवून अनु हिला बोलण्याचा बहाणा करून बाहेर बोलावले. त्यानंतर तू माझ्या भावाशी सारखी बोलते असा अनैतिक संबंधांचा संशय घेत, तसेच ती भावाच्या कुटूंबियासोबत राहत असल्याचा राग मनात धरून सोबत आणलेल्या चाकून अनुला भोसकले. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून, पुढील तपास गुन्हे निरीक्षक राजेश तटकरे करीत आहेत.

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : पुणे – मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलमध्ये साकारली महादेवाची पिंड

Back to top button