रवी शास्त्री बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्करला करतायंत मिस - पुढारी

रवी शास्त्री बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्करला करतायंत मिस

लीड्स : पुढारी ऑनलाईन

भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारताने पहिल्या दोन कसोटीत दमदार कामगिरी करत मालिकेत १ – ० अशी आघाडी मिळवली. दरम्यान, हेडिंग्ले येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी जास्त दिवसांचा ब्रेक मिळाल्यानंतर टीम इंडिया बरोबरच प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही थोडी उसंत मिळाली आहे.

दरम्यान, भारतीय संघाने सोमवारपासून आपल्या सरावाला सुरुवात केली. मात्र प्रशिक्षक रवी शास्त्री यांना बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्करची फारच आठवण येत आहे. त्यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांचे हे बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्कर दिसत आहे.

लगेच तुमच्या भुवया उंचावू नका हे सर्वजण रवी शास्त्री यांचे लाडेक श्वान आहेत. शास्त्रींनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत त्यांचे हे बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्कर त्यांच्यासाठी ठेवलेल्या मेजवाणीवर ताव मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करुन रवी शास्त्रींनी त्याला ‘माझे खास दोस्त बाऊन्सर, बीमर, फ्लिपर, स्किपर आणि यॉर्कर भारताच्या पश्चिम तटावर दुर्मिळ अशा सूर्यप्रकाश असलेल्या दिवशी आपल्या मेजवाणीवर ताव मारत आहेत. तुम्हाला खूप मिस करत आहे. लवकरचे भेटू!’ असे कॅप्शन दिले आहे.

टीम इंडियाचा सराव सुरु

दरम्यान, बीसीसीआयने टीम इंडियाचा सराव करतानाचा फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यात विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, केएल राहुल, आर. अश्विन, इशांत शर्मा आणि ऋषभ पंत यांचा सामावेश होता.

दुसरीकडे इंग्लंडचा संघ दुखापतग्रस्त खेळाडूंनी त्रस्त झाला आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज मार्क वूड देखील खांद्याच्या दुखापतीमुळे तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे. याबाबतची माहिती देताना इंग्लंडच्या क्रिकेट बोर्डाने सांगितले की. मार्क वूड भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी मुकणार आहे. त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. ‘

ते पुढे म्हणाले की, वूडला लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी खांद्याला दुखापत झाली. तो हेडिंग्लेवर २५ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी फीट नाही.’

हेही वाचले का? 

पाहा व्हिडिओ : विद्यार्थ्यांनी सीए होण्याचं स्वप्न बाळगावं

Back to top button