आयएसआय एजंटकडून दहशतवादाविरुद्धची लढाई शिकत होती काँग्रेस : भाजपचा टोला | पुढारी

आयएसआय एजंटकडून दहशतवादाविरुद्धची लढाई शिकत होती काँग्रेस : भाजपचा टोला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे सरकार सत्तेत असताना आपण अनेकदा तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निमंत्रणावरून भारतात आलो होतो व संवेदनशील माहिती पाकची गुप्तचर संस्था ‘आयएसआय’ ला देत होतो, असे पाकिस्तानी पत्रकाराने केलेल्या दाव्यावरून भाजपने काँग्रेस तसेच हमीद अन्सारी यांना धारेवर धरले आहे. यावरून काँग्रेस त्यावेळी आयएसआय एजंटकडून दहशतवादाविरुद्धची लढाई शिकत होती, असा टोला भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी माध्यमांशी बाेलताना लगावला.

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी केलेल्या संबंधित दाव्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. तर स्वतः अन्सारी यांनी मिर्झा यांच्या आरोपांचे खंडन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते भाटिया म्हणाले की, संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीकडे मोठी जबाबदारी असते.

कोणत्याही व्यक्तीच्यावर देश आणि देशाच्या नागरिकांचे हित असते. अन्सारी यांनी आरोपांचे खापर तत्कालीन काँग्रेस सरकारवर फोडले आहे. उपराष्ट्रपतीच्या कार्यक्रमात जे लोक बोलाविले जातात, ते सरकारच्या सल्ल्यावरून बोलाविले जातात, असे त्यांचे म्हणणे आहे. असे असेल तर ‘दहशतवादाविरुद्धची लढाई काँग्रेस आयएसआय एजंटकडून शिकत होती, ते सिद्ध झालेले आहे, असे भाटीया म्‍हणाले.

संबंधित बातम्या

हेही वाचा

Back to top button