जस्टीन लँगर यांना वाटेल की ‘खेळाडूंनी पाठीत वार केला’ | पुढारी

जस्टीन लँगर यांना वाटेल की 'खेळाडूंनी पाठीत वार केला'

सिडनी : पुढारी ऑनलाईन

ऑस्ट्रेलियाचा सलमावीर उस्मान ख्वाजा संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांच्या समर्थनात मैदानात उतरला आहे. त्याने संघाच्या पराभावाची जबाबदारी फक्त प्रशिक्षकांवर ढकलून चालणार नाही. खेळाडूंनीही पराभवाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाचे जस्टीन लँगर हे बांगलादेश विरुद्धची टी-२० मालिका गमावल्यानंतर रडावर आहेत. याचबरोबर घरच्या मैदानात बॉर्डर – गावस्कर ट्रॉफीत भारताकडून मिळालेल्या पराभवाचे भूतही त्यांच्याच मानगुटीवर बसले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा त्यांच्या समर्थनात आला.

ख्वाजा म्हणाला की, ‘जस्टीन लँगर यांना कसे वाटत असेल? त्यांना असे वाटत असेल की संघातील खेळाडू त्यांच्या पाठीत वार करत आहेत. सध्याचे चित्र तर असेच आहे म्हणूनच हे फार निराशाजनक आहे.’ ख्वाजाने इएसपीएन क्रिकइन्फो या युट्यूब चॅनलशी बोलताना हे वक्तव्य केले. तो म्हणाला की, हे खूप वाईट दिसते. त्यामुळे लवकरात लवकर संघाने हा विषय सोडवला पाहिजे.

लँगर ऑस्ट्रेलियन क्रिकेटबाबत पॅशिनेट

उस्मान ख्वाजा म्हणाला की, ‘नेहमी तुम्ही प्रशिक्षकाला जबाबदार धरू शकत नाही. खेळाडू कामगिरी करत नसतील तर खेळाडूंनी त्याची जबाबदारी घ्यायला हवी. ही एकाच व्यक्तीची जबाबदारी नाही.’ ख्वाजाच्या मते जस्टीन लँगर हे ऑस्ट्रेलियन क्रिकेटबाबत अत्यंत उत्कट आहेत. सर्वजण यशस्वी व्हावेत असे त्यांना वाटते.

‘लँगर हे अत्यंत पॅशिनेट व्यक्ती आहेत. त्यांना ऑस्ट्रेलियन क्रिकेट आवडते. सर्वांना यशस्वी झालेले त्यांना पहायचे आहे. त्यांना विजयाची आस आहे, योग्य प्रकारे विजय मिळवण्यासाठी ते धडपडतात. सँडपेपर प्रकरणानंतर योग्य पद्धतीचा विजय मिळवण्याची उर्मी त्यांनी संघात रुजवली. ते भावनाप्रधान आहेत. हाच त्यांची उणीव आहे.’ असेही उस्मान म्हणाला.

लँगर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या रडावर

‘भावनिकताच लँगर यांना खाली घेऊन जात आहे. त्यांना माहित आहे की त्यांना सुधारणा करण्याची गरज आहे. त्यांनी हे माध्यमातही सांगितले आहे.’ असेही ख्वाजा आपल्या वक्तव्यात म्हणाला.

गेल्या आठवड्यात जस्टीन लँगर यांना त्यांची प्रशिक्षणाची पद्धत ऑस्ट्रेलियासाठी योग्य आहे की नाही याबाबत विचारणा करण्यात आळी होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याचे समर्थन केले आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार टीम पेन याने लँगर यांच्यावर सातत्याने शंका घेण्याबाबत हे लज्जास्पद असल्याचे म्हटले होते.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या

 

Back to top button