Acid attack : प्रेमाविवाहासाठी तिने स्वतःवरच केला अ‍ॅसिड अटॅक! | पुढारी

Acid attack : प्रेमाविवाहासाठी तिने स्वतःवरच केला अ‍ॅसिड अटॅक!

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : प्रेम ही महान गोष्ट आहे. याच प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची मानसिकता आजच्या तरुण-तरुणींची होत चालली आहे. अशीच एक धक्कादायक घटना आपल्यासमोर घडली आहे. कुटुंबियांनी आपल्या लग्नाला परवानगी द्यावी, यासाठी एक प्रेमयुगुलाने भयंकर असं पाऊल उचललं. आपल्या प्रियकरासोबत लग्न करता यावं, यासाठी प्रेयसीने स्वतःवरच अ‍ॅसिड अटॅक (Acid attack) करून घेतला.

मुलीने हे टोकाचं पाऊल उचलल्यानंतर मुलीच्या घरातील लोकांनी तिचं प्रियकरासोबत लग्न लावून दिलं. बिहारच्या नालंदा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. तीन दिवसांत या घटनेचा तपास पोलिसांनी लावला.

पोलिस अधिकारी शिब्ली नोमानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं साजन कुमार नावाच्या तरुणासोबत गेल्या ७ वर्षांपासून प्रेमप्रकरण होतं. मात्र तरुणीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला होता. त्यामुळे या दोघांनी मिळून हा मोठा निर्णय घेतला. तसेच अ‍ॅसिड अटॅक (Acid attack) करून शरीराच्या काही भागाला इजा पोहोचवण्याचं ठरवलं. ॉ

असं केल्यानंतर तरुणीच्या घरचे लग्नाला तयार होतील असं त्यांना वाटलं. म्हणूनच १८ ऑगस्टला साजनने आपल्या तीन भावांसह हे कृत्य केलं. ज्या दिवशी घटना घडली तेव्हा साजन आणि तरुणी एकत्रच फिरत होते. तरुणीवर दोन तरुणांनी अ‍ॅसिड फेकल्याची घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणाचा अधिक तपास केला असता ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पहा व्हिडीओ : आईचे तुकडे करणारा नराधम फासापर्यंत कसा पोहोचला?

Back to top button