CAA ची गरज आता लक्षात येत आहे ः केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी | पुढारी

CAA ची गरज आता लक्षात येत आहे ः केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन : केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तालिबानच्या अफगाणिस्तानातील वाढत चाललेल्या हलचाली पाहता देशात नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आवश्यक असल्याचे वक्तव्य ट्विटवरून केले आहे.

ट्विटमध्ये हरदीप सिंह पुरी म्हणाले की, “अफगाणिस्तान देशात घडणाऱ्या बाबी लक्षात घेता आणि तसेच हिंदू-शिख समुदायातील लोक ज्या पद्धतीच्या त्रासातून जात आहे, त्यावरून असं लक्षात येतं आहे की, देशात नागरिकत्व संशोधन कायद्याची गरज लक्षात येत आहे”, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
haradip singh puri
सीएए कायद्याचं विशेष हे आहे की, आपल्या शेजारी देशांमध्ये अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, पारसी, शिख आणि इसाई) यांना भारतीय नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव या कायद्यात आहे. यासंदर्भात सध्याच्या अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांनुसार कोणत्याही व्यक्तीला भारताचं नागरिकत्व हवं असेल, तर किमान ११ वर्षे भारतात रहावं लागेल.
मात्र, सीएए कायद्यानुसार अल्पसंख्यांकांसाठी नागरिकत्व मिळण्यासाठी ११ वर्षांची अट शिथिल करून ६ वर्षं करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील सध्याच्या हलचाली पाहता सीएए (CAA) हा कायदा किती महत्वाचा आहे, हे लक्षात येतं, असं केंद्रीय हरदीप सिंह पुरी यांनी ट्विटमधून मांडलेलं आहे.

पहा व्हिडीओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान पुढारी ऑनलाईनवर

Back to top button