( व्हिडिओ ) ‘काय झाडी..काय डोंगर..५० खोके पक्के’ काँग्रेस आमदार गोरंट्याल असे का म्‍हणाले? | पुढारी

( व्हिडिओ ) 'काय झाडी..काय डोंगर..५० खोके पक्के' काँग्रेस आमदार गोरंट्याल असे का म्‍हणाले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांचा काय झाडी…काय डोंगार…काय हाटील समधं ओक्केमध्ये हाय… असा संवाद असणारी ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अशाच संवादशैलीत कॉंग्रेस आमदार कैलास गोरंट्याल (Kailash  Gorantyal) यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. कैलास गोरंट्याल यांनी आपल्या शायरीतून बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले. ते गुवाहाटीला (आसाम) गेले. त्यांना एक एक करत शिवसेनेचे आमदार मिळाले. त्यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटीलहेही होते. गुवाहाटीला गेल्यानंतर बऱ्याच आमदारांनी आपले मोबाईल बंद करुन ठेवले होते. शहाजीबापू यांचाही मोबाईल बंद होता. या दरम्यान त्यांचे कार्यकर्ते त्यांना फोन करत होते; पण त्यांचा फोन बंद लागत होता. फोन लागताच त्यांचा कार्यकर्ता त्यांना विचारतो “नेते कुठाय, तेव्हा गुवाहाटीमधील वर्णन करताना म्हणतात. काय झाडी..काय डोंगार…काय हाटील ओक्केमध्ये सगळं… हा संवाद सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्याचे मिम्स, गाणी होवू लागली. या एका वाक्याने शहाजीबापूंची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड झाली.
कैलास गोरंट्याल : काय झाडी, काय डोंगार, काय हाटील…५० खोके पक्के 
काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलताना बंडखोर नेत्यांना शायरीतून चिमट काढला. आहे. शहाजीबापू यांचा काय झाडी..काय डोंगार…काय हाटील ओक्के मध्ये सगळं… हा  डायलॉग घेवून त्‍यांनी शिंदे गटाच्‍या आमदरांवर टीका केली. यामध्ये ते म्हणतं आहेत, काय झाडी..काय डोंगार…काय हाटील ओक्के? पन्नास खोके पक्के…! कैलास गोरंट्याल यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काल झालेल्या बहुमत चाचणीवेळीही त्यांनी ‘ऐसे वैसे कैसे कैसे हो गये, और कैसे कैसे ऐसे वैसे हो गये’ असे म्हणतं आपल्या शायरीतून त्‍यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.
पाहा व्हिडिओ : काय झाडी, काय डोंगर… ५० खोके पक्के

हेही वाचलंत का? 

Back to top button