वर्षभरात एक हजार एसटी सीएनजीत | पुढारी

वर्षभरात एक हजार एसटी सीएनजीत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : आर्थिक तोटा आणि इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने डिझेलवर धावणार्‍या एक हजार बस सीएनजीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एका खासगी कंपनीची नियुक्‍ती केली आहे. येत्या एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

महामंडळाच्या ताफ्यात 16 हजार एसटी आहेत. ठाणे विभागात सध्या फक्‍त 50 सीएनजी बस आहेत. एकूण खर्चापैकी डिझेलवर पूर्वी 34 टक्के खर्च होता. सध्या हा खर्च 38 ते 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. कोरोनाआधी दररोजचे उत्पन्न 21 ते 22 कोटी रुपये होते. सध्या दररोजचे उत्पन्न 18 कोटी रुपये आहे. वाढणारा खच, घटलेले उत्पन्न पाहता महामंडळाने ताफ्यात सीएनजीवर धावणार्‍या बस दाखल करण्याचा निर्णय घेतला.

नवीन बस न घेता सध्या धावत असलेल्या बसपैकी एक हजार बस या सीएनजीसाठी परिवर्तित केल्या जाणार आहेत. यासाठी 140 कोटी रुपये खर्च येणार आहे. यसीएनजी स्टेशन्स हे राज्यात सर्व ठिकाणी उपलब्ध नसल्याने मुंबई, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यातच सुरुवातीच्या काळात सीएनजी बस चालवण्याचे नियोजन आहे.

Back to top button