राज्यात आजपासून चार दिवस मुसळधार; रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट | पुढारी

राज्यात आजपासून चार दिवस मुसळधार; रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

पुणे : पुढारी वृत्तसेवा: सोमवार (दि. 4) पासून चार दिवस राज्यातील बहुतांश भागांत चांगल्या पावसाला सुुरुवात होत आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरीला तीन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हा पाऊस 7 जुलैपर्यंत राहणार आहे. ओडिशा भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मान्सूनच्या वार्‍यांचा वेग पुन्हा वाढला आहे. त्याचा फायदा महाराष्ट्रालाही होणार आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार 4 ते 7 जुलैदरम्यान कोकणात अतिवृष्टी, तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या कालावधीत फक्त उत्तर महाराष्ट्रात कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सावधानतेचा इशारा..
हवेचे दाब कमी झाल्याने मान्सूनच्या वार्‍यांचा वेग राज्यात वाढला असून, ताशी 40 किमी वेगाने वारे वाहणार आहे. तसेच, विजांच्या कडकडाटासह राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. यात प्रामुख्याने संपूर्ण कोकणासह मुंबई, ठाणे व मराठवाड्यातील लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, तसेच विदर्भालादेखील सावधानेचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यातील 24 तासांतला पाऊस (मिमीमध्ये)
कोकण: पालघर (170), ठाणे ( 100), रोहा (100), माणगाव (90), अलिबाग (80.8), भिवंडी (80.8), उरण (80.5), वसई (80.4), पनवेल (70.7), लांजा (70), पोलाद, खालापूर, कुडाळ (50).

मध्य महाराष्ट्र: सुरगणा (70), राधानगरी (50.90), गगनबावडा (50.3), ओझरखेडा (40.7), कोल्हापूर (10.8),
पुणे (10), नाशिक (9)

मराठवाडा: उमरगा (30.5), उदगीर (30.2), मुदखेड (20.6), परतूर (20), हादगाव (10.5), सेलू (10)

विदर्भ : नेर (20.6), गोेंडपिंपरी, यवतमाळ (20), तिरोडा, जीवती, कोटोल (10)

घाटमाथा : डुंगुरवाडी (130), दावडी (130), भीरा (110), ताम्हिणी, कोयना (70.5), अंबोणे (70)

ऑरेंज अलर्ट..
रायगड (4 ते 7 जुलै)
रत्नागिरी (4 ते 7 जुलै)
गडचिरोली (5 ते 7 जुलै)
अकोला (5 जुलै)
चंद्रपूर (6 जुलै)

यलो अलर्ट (4 ते 7 जुलै)
मुंबई, कोल्हापूर, ठाणे, पालघर, सातारा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बुलडाणा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा, वाशीम

ओडिशा राज्यासह बाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात वार्‍यांनी मोठा वेग घेतला आहे. त्यामुळे 5 जुलैपासून संपूर्ण देशातच पाऊस वाढणार आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात तो 5 ते 9 जुलैपर्यंत राहील.

                                     -डॉ. कृष्णानंद होसाळीकर, पुणे हवामान वेधशाळाप्रमुख

Back to top button