नशिबालाच कर्तृत्व समजले की र्‍हासाची सुरुवात ; राज ठाकरे | पुढारी

नशिबालाच कर्तृत्व समजले की र्‍हासाची सुरुवात ; राज ठाकरे

मुंबई :  पुढारी वृत्‍तसेवा :   मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुरुवारी त्यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली आहे. ‘एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबाला स्वतःचे कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा र्‍हासाकडे प्रवास सुरू होतो’, असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.

शिवसेनेत अंतर्गत बंडाळी सुरू झाल्यानंतरही राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सरकारवरील विश्‍वासदर्शक ठरावावेळी मनसेचा एकमेव आमदार भाजपला पाठिंबा देईल, अशीही घोषणा त्यांनी केली होती. मात्र सरकार कोसळल्याने विश्‍वासदर्शक ठराव मांडला गेला नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताच राज ठाकरे यांनी ट्विट करून चिमटा काढला.

Back to top button