फुलाला सुगंध मातीचा : सागर बांधणार कीर्तीला राखी | पुढारी

फुलाला सुगंध मातीचा : सागर बांधणार कीर्तीला राखी

मुंबई; पुढारी ऑनलाईन : फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत कीर्तीचा भाऊ सागर कीर्तीला राखी बांधणार आहे. बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन.

अधिक वाचा- 

भावाने आपलं रक्षण करावं म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण भावाला राखी बांधते. स्टार प्रवाहच्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेत देखिल रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

Phulala Sugandha Maticha

अधिक वाचा- 

Phulala Sugandha Maticha
फुलाला सुगंध मातीचा

भाऊ बहिणीला बांधणार राखी

पण, इथे कीर्तीने आपल्या भावाला राखी बांधण्याऐवजी तिच्या भावाने तिला राखी बांधलीय. कीर्तीचं शौर्य आणि तिच्या धाडसाच्या बऱ्याच गोष्टी आपण मालिकेतून पहात आलोय.

नुकतंच तिने आपल्या कुटुंबाला एका मोठ्या दहशतवादी हल्ल्यातून वाचवत कौतुकाची थाप मिळवली. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी कीर्तीचा भाऊ सागर तिला राखी बांधेल. फक्त कुटुंबाचच नाही तर देशाचं रक्षण करण्यासाठी प्रेरणा देतो.

मालिकेतला हा प्रसंग नव्या बदलाची नांदी आहे असं म्हटलं तरी चालेल. कीर्तीने आयपीएस ऑफिसर होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं आहे.

अधिक वाचा- 

कीर्तीच्या या स्वप्नपूर्तीमध्ये तिला शुभमची कशी साथ मिळणार याची देखील उत्सुकता आहे. त्यामुळे मालिकेचे यापुढील भाग अधिकाधिक रंजक आणि उत्कंठावर्धक असणार आहेत.

पाहा सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

हेदेखील वाचलंत का- 

पाहा व्हिडिओ- एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज ‘सोप्पं नसतं काही ‘ 

 

Back to top button