Jammu & Kashmir : अवंतीपोरा येथे चकमक, एक दहशतवादी ठार | पुढारी

Jammu & Kashmir : अवंतीपोरा येथे चकमक, एक दहशतवादी ठार

श्रीनगर; पुढारी ऑनलाईन : जम्मू- काश्मीरमधील (Jammu & Kashmir) अवंतीपोरा येथील ख्रेवमध्ये शुक्रवारी सकाळी सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांत चकमक झाली. अवंतीपोरा (Jammu & Kashmir) येथील या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा जवानांना यश आले. ठार करण्यात आलेला दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित आहे याची अद्याप पुष्टी झालेली नाही.

या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची शक्यता आहे. यामुळे येथे अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.

जम्मू- काश्मीर पोलिसांनी याबाबत माहिती देताना सांगितले आहे की अवंतीपोराच्या पम्पोर भागातील ख्रेवमध्ये दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिस आणि सुरक्षा जवानांनी या भागाची घेराबंदी केली. येथे अद्याप चकमक सुरु आहे.

दरम्यान, भारत-पाक सीमेवरील राजौरी जिल्ह्यातील थन्‍नामंडी सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत दोन भारतीय जवान शहीद झाले होते. चकमकीत एका दहशतवाद्याला ठार मारण्यात आले.

सीमावर्ती भागात अनेक दहशतवादी लपून बसल्याच्या संशयाने भारतीय सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. थन्‍नामंडी सेक्टरमध्ये गुरुवारी सकाळी दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक झाली.

यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. मात्र त्या बदल्यात दोन भारतीय जवानांना आपले प्राण गमवावे लागले. लष्कराचे ज्युनिअर कमिशन ऑफिसरसह दोन जवानांना हौतात्म्य आले. सीमावर्ती भागातील जंगलात दोन ते तीन दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले, टायर पकडून चालले होते लटकत |

Back to top button