न्‍यूझीलंड : कोरोनाचा एक रुग्‍ण आढळला, संपूर्ण देशात लॉकडाउन | पुढारी

न्‍यूझीलंड : कोरोनाचा एक रुग्‍ण आढळला, संपूर्ण देशात लॉकडाउन

ऑक्‍लंड ; पुढारी ऑनलाईन: न्‍यूझीलंड मध्‍ये कोरोनाचा नवा रुग्‍ण आढळला आहे. ऑक्‍लंडमध्‍ये आढळलेल्‍या या नव्‍या रुग्‍णांमुळे पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी खबरदारीचा उपाय म्‍हणून संपूर्ण न्‍यूझीलंड मध्‍ये लॉकडाउन जाहीर केले आहे. काेराेना संसर्गाचा फैलाव टाळण्‍यासाठी  संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्‍यात आल्‍याची घाेषणा पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना पंतप्रधान जेसिंडा अर्डने म्‍हणाल्‍या की, ऑक्‍लंडमध्‍ये कोरोनाचा रुग्‍ण आढळला आहे. यामुळे ऑक्‍लंडमध्‍ये सात दिवस सलग लॉकडाउन असेल. तर अन्‍य शहरांमध्‍ये तीन दिवसांचा लॉकडाउन असेल. याची कार्यवाही तात्‍काळ करण्‍यात येत आहे. सर्वांनी वर्क फॉर्म होम करावे, असा सल्‍लाही त्‍यांनी दिला आहे. या लॉकडाउनच्‍या काळात देशातील सर्व शैक्षणिक संस्‍थाही बंद राहणार आहेत.

डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट नाही

ऑक्‍लंडमध्‍ये कोरानाबाधित रुग्‍ण आढळला आहे. मात्र तो डेल्‍टा प्‍लस व्‍हेरिएंट नाही, असे वैद्‍यकीय अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

संपूर्ण जगासमोर होता न्‍यूझीलंडचा आदर्श

गेली दीड वर्षांहून अधिक काळ संपूर्ण जगाला कोरोनाने वेठीस धरले आहे.

या काळात न्‍यूझीलंडने कोरोनावर नियंत्रण मिळवले.

कोरोनाविरोधातील लढाईत न्‍यूझीलंडने आघाडी घेतली होती.

या देशातील रुग्‍णसंख्‍या आणि मृत्‍यू दरही जगाच्‍या तुलनेत खूपच कमी आहे.

कोरोनाची सुरुवात झाल्‍यानंतर न्‍यूझीलंडने सर्वप्रथम आपल्‍या देशाच्‍या सर्व सीमा सील केल्‍या होत्‍या.

यावेळी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची योग्‍य अंमलबजावणी करण्‍यात आल्‍याने न्‍यूझीलंड हा जगासमोर आदर्श होता.

तसेच या देशाने कोरोनावर नियंत्रण मिळवत जगात प्रथम अनलॉक केले होते. मात्र आता येथे पुन्‍हा एकदा रुग्‍ण आढळल्‍याने आरोग्‍य यंत्रणा हादरली आहे.

पुन्‍हा एकदा कोरोनावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी लॉकडाउनचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचलं का ?

पाहा व्‍हिडिओ :अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button