राजकीय वाटचाल कोणत्‍या दिशेने? | पुढारी

राजकीय वाटचाल कोणत्‍या दिशेने?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांपासून शिवसेनेत निर्माण झालेली बंडाळी संपुष्टात येण्याची आशा पूर्णपणे मावळल्याने राज्यात सत्तासंघर्ष तीव्र झाला असून, ही लढाई आता कायदेशीर वळणे घेऊ लागली आहे. विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्‍तीला मान्यता देत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटाला पहिला धक्‍का दिला.

पाठोपाठ बंडखोर आमदारांना अपात्र ठरविण्याच्या नोटीसा शनिवारी उपाध्यक्षांकडून जाणार असतानाच झिरवाळ यांच्यावर अविश्‍वास प्रस्ताव दाखल करत त्यांचे अधिकारच निष्प्रभ करण्याचा डाव शिंदे गटाने टाकला आहे.

पहा राजकीय घडामोडी

  • शरद पवारांना धमक्या देणे ही भाजपची संस्कृती आहे काय? खा. संजय राऊत यांचा भाजपला सवाल
    सत्ताबदलाशी भाजपचा संबंध नाही, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन. भाजपला एकनाथ शिंदे यांच्याकडून कसलीही ऑफर आलेली नाही.
  • 48 तासांत तब्बल 160 शासकीय निर्णय घेण्यात आल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार निधीचा गैरवापर करत असल्याचा भाजपकडून आरोप, आ. प्रवीण दरेकर यांची राज्यपालांना हस्तक्षेप करण्याची विनंती महाविकास आघाडी आजही बहुमतात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा
  • कट्टर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांच्या निकटचे म्हणून ओळखले जाणारे मुंबईतील चांदीवलीचे आमदार दिलीप लांडे हेही एकनाथ शिंदे गोटात दाखल. गुवाहाटीत झाले जल्लोषपूर्ण स्वागत
  • महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचे जागतिक पडसाद! पाकिस्तानसोबतच सौदी अरेबिया, मलेशिया, नेपाळ, बांगलादेश, थायलंड, जपान व कॅनडातही एकनाथ शिंदेंच्या नावाने गुगल सर्च केले जात आहे.
  • महाविकास आघाडी अनैसर्गिक, शिवसेनेत बंड होणारच होते. सरकार जवळपास पडले असून धमक्या देणार्‍यांना त्यांची जागा दाखवणार, उदयनराजे भोसले यांचे शिवसेनेतील बंडखोरीवर वक्तव्य
  • मी महाराष्ट्रापुरते बोलतो. देशातील इतर विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते बोलतात. शरद पवार यांनी एखाद्या विषयावर काही वक्तव्य केल्यावर त्यावर बोलायची माझी लायकी नाही ः उपमुख्यमंत्री अजित पवार
  • संकटकाळात पक्षाने साधी विचारपूसही केली नाही, एकनाथ शिंदे गटातील आमदार यामिनी जाधव यांची सूचक प्रतिक्रिया
    बंडखोर गटाला भाजप किंवा प्रहारमध्ये प्रवेश करावाच लागेल. त्यांना शिवसेनेचे नाव किंवा निवडणूक चिन्हही वापरता येणार नाही ः शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांचे वक्तव्य.
  • मी उद्धव ठाकरेंना सोडून गेलो नाही. एकनाथ शिंदे गटाशी चर्चा करायला हवी ः रत्नागिरीचे शिवसेना आ. व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया
  • बंडखोर आमदार प्राईस टॅग लावल्यासारखे गेले, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया.
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुट्टी घालवण्यासाठी आसामला यावे, राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांचे वक्तव्य.
  • ज्येष्ठ नेते शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्री येथे खलबते. उपमुख्यमंत्री अजित पवार हेही बैठकीत सामील. मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची गर्दी.
  • महापुरामुळे आसामात जनजीवन विस्कळीत झाल्याच्या मुद्यावरून आसामचे काँग्रेस नेते भूपेन कुमार बोराह यांनी एकनाथ शिंदे यांना लवकर गुवाहाटी सोडण्याची केली विनंती
  • शिवसेनेने शनिवारी बोलावली आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक.

Back to top button