Wonder Woman गल गदोतनं शेअर केला ब्रेस्ट मिल्क पंपचा फोटो, दिला 'हा' संदेश | पुढारी

Wonder Woman गल गदोतनं शेअर केला ब्रेस्ट मिल्क पंपचा फोटो, दिला 'हा' संदेश

पुढारी ऑनलाईन डेस्क; वंडर वूमन नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री आणि मॉडेल Wonder Woman गल गदोत (Gal Gadot) नेहमीच बोल्ट स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. तीन मुलांची आई असलेल्या Wonder Woman गल गदोत हिने (Gal Gadot) शुटिंगच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

ज्यात तिने चाहत्यांना वर्किंग वूमन म्हणून काम करत असताना एका आईची जबाबदारी काय असते याबाबत अनोखा संदेश दिला आहे. फोटोमध्ये ती चित्रपटाच्या सेटवर आहे. ती एका खुर्चीवर बसली असून तिचा हेअर मेकअप केला जात आहे. मेकअप सुरु असतानाच गल गदोत ब्रेस्ट मिल्क पंप करत असताना दिसते.

हा फोटो शेअर करत गलने लिहिले आहे की, फक्त मी, बॅकस्टेज, एक आई आहे. गलने गेल्या जूनमध्ये तिसऱ्या मुलीला जन्म दिला. तिला एलमा वरसानो (वय ९) आणि माया वरसानो (वय ४) अशा दोन मोठ्या मुली आहेत.

गलने शेअर केलेल्या फोटोत ती रिलॅक्स आणि खूश दिसत आहे. तिच्या या फोटोवर लोकांनी तुम्ही एक उत्तम अभिनेत्री सोबतच एक चांगली आई आहात. तुम्ही लोकांची मने जिंकली आहेत, अशा कमेंट्स केल्या आहेत.

गलने आपल्या फोटोतून महिलांना ब्रेस्ट मिल्क पंपिंग सुरक्षित असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः ज्या महिला घरची जबाबदारी सांभाळून काम करतात त्यांनी आई झाल्यानंतर ब्रेस्ट फिडिंगसाठी हा पर्याय निवडावा, असेही तिने म्हटले आहे.

गल गदोतने अवघ्या १८ व्या वर्षी २००४ मध्ये मिस इस्राईलचा किताब जिंकला होता. त्यानंतर तिने काही काळ इस्राईल संरक्षण दलात सैनिक म्हणून सेवा दिली. गलला २००९ मध्ये पहिल्यांदा फास्ट अँड फ्युरियस (Fast & Furious) या अमेरिकन चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने ‘वंडर वुमन १९८४’ मध्ये दमदार भूमिका निभावली.

हे ही वाचा :

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Gal Gadot (@gal_gadot)

Back to top button