सातारा : शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भोसलेंना गुवाहाटीत पोलिसांनी घेतले ताब्यात | पुढारी

सातारा : शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय भोसलेंना गुवाहाटीत पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा : पुढारी वृत्तसेवा : एकनाथ शिंदेंच्या बंडात सामील झालेले शिवसेनेचे आमदार सध्या गुवाहाटीमधील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. हे सर्व आमदार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत. यामुळे राज्‍यात राजयकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक आमदार शिंदे गटाला जावून मिळाले आहेत. तसेच आता काही खासदार आणि अपक्ष नेतेही मिळाले आहेत.

दरम्‍यान, शिवसेनेचे सातारा उपजिल्हा प्रमुख संजय भोसले हे गुवाहाटीला गेले आहेत. तेथे त्यांनी एकनाथ शिंदे आणि आमदारांनी परत येण्यासाठी रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले आहे.  तसेच त्‍यांच्यासमवेत साताऱ्यातून ३ ते ४ शिवसैनीक गुवाहाटी येथे दाखल झाल्‍याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा  

Back to top button