Headphone : हेडफोन घेताय? या गोष्टींची माहिती हवीच! | पुढारी

Headphone : हेडफोन घेताय? या गोष्टींची माहिती हवीच!

पुढारी ऑानलाईन डेस्क : मोबाईल म्हटलं की हेडफोन (Headphone) आलाच. हेडफोन आपल्या दैनंदीन जीवनातील मोबाईलसोबत महत्वाचा भाग बनत चालला आहे. वाहन चालवतातना असो अथवा कोणत्याही ठिकाणी असो हेडफोन हा आपल्याजवळ असतोच. कोणताही लांबचा प्रवास करायचा असल्यास आपण बाकीच्या वस्तूंसोबत हेडफोन(Headphone) आहे की नाही याची नक्की खात्री करतो. ऑफिसमध्ये आपल्या शेजारील कोणाला त्रास होऊ नये यासाठी हेडफोनचा वापर आपण आवर्जून हा करतोच. असा हा हेडफोन आपल्या जीवनाचा एक घटक बनत चालला आहे.

आपण याचा किती वापर करावा यापासून आपल्याला काही दुष्परिणाम भोगावे लागतात का? म्हणून हेडफोन खरेदी करताना त्यातून येणारा आवाज, त्याचा आकार, किंमत हे फार महत्त्वाचे असते. आपल्या कानाला कोणतीही इजा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी चांगला हेडफोन कसा निवडावा याबाबत जाणून घ्या.

हेडफोन घेताना या गोष्टी लक्षात ठेवा…

हेडफोन घेताना तुम्हा त्याचा वापर कोणत्या कारणासाठी करणार आहात याबाबत विचार करा.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे तुम्ही किती रुपये हेडफोनसाठी घालणार आहात तुमच्या बजेटमध्ये बसेल का याबाबत पहिल्यांदा समजून घ्या.

हेडफोनच्या बऱ्याच कंपन्या बाजारात आल्या आहेत त्यातील तुम्हाला कोणती कंपनी योग्य वाटते यावर तुम्ही पहिल्यांदा गुगल सर्च करून बघू शकता.

तुम्हाला कानात फिट बसणारा (इअरबड) हेडफोन हवा की कानावर बसणारे हेडफोन हवेत, याचीही माहिती घ्या.
हेडफोन विकत घेतेवेळी त्याचा सर्वाधिक वापर कधी होणार आहे, हे पाहिले पाहिजे.

जर तुम्ही प्रवासात हेडफोनचा जास्त वापर करणार असाल, तर‘इअरबड’ हेडफोन चांगले मानले जातात.

तर घरातील म्युझिक सिस्टीमवरून गाणी ऐकण्यासाठी ‘ऑनइअर’ किंवा ‘ओव्हर इअर’ हेडफोन उपयुक्त ठरतात.

हेडफोनमधून गाणी ऐकताना मोठ्या आवाजात गाणी ऐकणे शक्यतो टाळा.

कमी आवाज ठेवल्याने तुमच्या कानाला कोणतीही इजा होत नाही. किंवा कोणताही धोका निर्माण होत नाही.

आवाज मोठा करूनच संगीत व्यवस्थित ऐकता येत असेल तर अशा हेडफोन काही काळानंतर त्रासदायक ठरु शकतात.

हेडफोन कानाला लावल्यानंतरही आजूबाजूचा आवाजच जास्त येत असेल तर त्याचा काहीही फायदा होत नाही.

हेडफोनची फ्रिक्वेन्सी पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. 10 हार्ट्झपासून 25 हजार हार्ट्झदरम्यानची फ्रिक्वेन्सी असलेले हेडफोन केव्हाही चांगले समजले जातात.

Back to top button