Gold Rate Today : सोने आणखी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा दर
नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात सोने (Gold Rate Today) आणि चांदी दरात घसरण झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव (Gold Rate Today) १३५ रुपयांनी स्वस्त होऊन प्रति ग्रँम ४७,४४८ रुपये झाला. तर चांदी दरातही प्रति किलोमागे २७९ रुपयांची घसरण झाली.
सोन्याचा दर आता उतरत असला तरी दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव ५० हजारापर्यंत जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
- पुणे पोलीस आयुक्तालय : दारात पेटवून घेत जळत्या व्यक्तीची आयुक्तालयात धाव
- ब्युटी पार्लर प्रशिक्षण देण्याच्या नावाखाली ४१ विद्यार्थींनीची फसवणूक
इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोशिएशनच्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,४४८ रुपये (प्रति १० गँम) एवढा होता. तर २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७,२५८ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,४६२ आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ३५,५८६ रुपये एवढा होता.
चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,६५७ रुपयांवर आला आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात २७९ रुपयांची घसरण झाली.
- देवमाणूस पुन्हा वाड्यावर परतणार; दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली?
- बलात्कार पीडितेची पोस्ट डिलीट करा; राहुल गांधींना फेसबुकची नोटीस
देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी वाढती आहे. यामुळे दिवाळीपर्यंत दर वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकी डॉलरच्या मुल्यात घसरण झाल्याने सोने दराला झळाळी मिळत आहे. पण गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. यामुळे भारत आणि चीन सारख्या देशांतून सोन्याला मागणी वाढली आहे.
- जास्त कॅल्शिअम घेतल्यास तुम्ही ‘या’ आजाराचे होऊ शकता शिकार
- देवमाणूस पुन्हा वाड्यावर परतणार; दुसऱ्या सीझनची उत्सुकता वाढली?
सोने आणि चांदी दरात गेल्या आठवड्यात घसरण झाली होती. सोन्याचा दर ९५० रुपयांनी घसरला होता. तर चांदी तब्बल ४,१०० रुपयांनी स्वस्त झाली होती.
हे ही वाचा :
- मनसे इंजिनाची धडक कोणाला बसणार?; राज ठाकरेंनी बदलली रणनिती!
- सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता
- अवधूत गुप्तेसोबत इंडियन आयडल फायनलिस्ट सायली कांबळे हिचे नवे गाणे (Video)