गोवा : भाजपच्या एका मंत्र्याला मिळणार डच्चू? | पुढारी

गोवा : भाजपच्या एका मंत्र्याला मिळणार डच्चू?

पणजी; पुढारी वृत्तसेवा : गोवा येथील भाजपच्या एका मंत्र्याला मिळणार डच्चू मिळणार आहे. भाजप सरकारमधील सुरु असलेली धुसफूस आता परिणाम करणारी ठरणार आहे. येत्या काही दिवसांत सरकारातील एका वजनदार मंत्र्याला डच्चू दिला जाणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी ‘दै. पुढारी’ला दिली आहे.

अधिक वाचा –

भाजप सरकारात सर्व आलबेल आहे. असे दाखवले जात असले तरी अनेक मंत्र्यांतील संदोपसुंदी पुढे आली आहे. मग मुख्यमंत्री प्रमोद सावंत असो की आरोग्य मंत्री विश्वजीत राणे असोत.

अधिक वाचा – 

सरकारात राहून विरोधी मत व्यक्त केल्याने हा मंत्री चर्चेत राहिला होता. पक्षाने त्यांना वारंवार ताकिद देऊनही त्या मंत्र्यामध्ये बदल झाला नाही. त्यामुळे पक्षीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्या मंत्र्याला वगळावे. असा सूर निघाला होता. त्या मंत्र्याचा सध्या एक पाय भाजपमध्ये तर दुसरा पाय अन्य पक्षात जाण्यासाठी उत्सुक आहे.

अधिक वाचा –

भाजपचे वरिष्ठ नेते बी. एल. संतोष बुधवारी गोव्यात येत आहेत. त्यामुळे त्या मंत्र्याला काढण्यावर निर्णय होईल. त्याचबरोबर काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री भाजपमध्ये दाखल होणार आहे. तो प्रवेशही संतोष व प्रभारी सी. टी. रवी यांच्या उपस्थितीत करण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेदेखील वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ- एक स्त्री आणि दोन पुरूष एकत्र राहू शकतात का? नवी वेबसेरिज ‘सोप्पं नसतं काही ‘

Back to top button