इंजिनीअर नवरा बायकांसारखा नटतो! | पुढारी

इंजिनीअर नवरा बायकांसारखा नटतो!

इंदूर : वृत्तसंस्था :  पती बायकांसारखा नटतो आणि वेगळा झोपतो या कारणास्तव मध्य प्रदेशमध्ये वास्तव्यास असलेल्या एका महिलेने पतीविरोधात पोलीस ठाण्यात, न्यायालयातही दाद मागितली. आपल्या दाव्याला पुष्टी देण्यासाठी या महिलने पतीचे काही फोटो न्यायालयात सादर केले. त्यानंतर पतीने महिलेला दरमहा 30 हजार रुपये द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.

लसुडिया मोरी येथे वास्तव्या असलेल्या महिलेचा विवाह 29 एप्रिल 2018 रोजी 32 वर्षांच्या दिलेश्‍वरशी झाला. दिलेश्‍वर (नाव बदललेय) पेशाने इंजिनीअर आहे.  दोन वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर दोघांचा विवाह झाला. लग्‍नानंतर दोघे पुण्यात राहू लागले. त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंबच पुण्यात आले. दिलेश्‍वर, त्याची आई आणि नणंद आपल्याला सातत्याने टोमणे मारायचे, असा दावा महिलेने केला आणि याची तक्रार तिने इंदूर पोलिसांकडे केली. पती लग्‍नानंतर कायम दूर राहायचा. तो कधीच जवळ यायचा नाही. मी त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केल्यावर तो दुसर्‍या खोलीत निघून जायचा, असे महिलेने पोलिसांना सांगितले. महिलेला पतीबद्दल शंका आली. तिने त्याच्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिला पतीबद्दल अनेक धक्‍कादायक गोष्टी समजल्या. त्यामुळे तिच्या पायाखालची जमीन सरकली.

संध्याकाळ होताच महिलेचा पती महिलांप्रमाणे नटत होता. हेअरबँड, टिकली, कानातले घालत होता. लिपस्टिक लावत होता. महिलेने याबद्दल विचारताच त्याने तिला मारहाण केली. पतीने महिलेला पुण्याहून इंदोरला सोडले. नंतर तो कधीच तिला न्यायला आला नाही. यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Back to top button