एफवाय पदवी प्रवेशाची पहिली कट ऑफ जाहीर | पुढारी

एफवाय पदवी प्रवेशाची पहिली कट ऑफ जाहीर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : एफवाय पदवी प्रवेशाची पहिली कटऑफ मंगळवारी जाहीर झाला. यंदाही नामवंत महाविद्यालयांत मोठी चुरस असून कटऑफने 98 टक्के पार केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रत्येक महाविद्यालयातील कटऑफ 4 ते 5 टक्क्यांनी वाढलेला आहे. कला शाखेचा कट ऑफ तब्बल सात ते आठ टक्क्यांनी वाढला आहे. नव्वदी तसेच त्या आसपास असलेल्या विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना आता दुसर्‍या आणि तिसर्‍या यादीची वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्‍न महाविद्यालयांतील एफवाय प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. मुंबईतील नामांकित अशा रुईया, जयहिंद, रुपारेल महाविद्यालयांचा कट ऑफ 90 पेक्षा जास्त टक्क्यांपर्यंत पोहचल्याचे दिसून आले. कटऑफवर नजर टाकल्यास कला आणि वाणिज्य शाखातील कटऑफ अधिक वरचढ पहायला मिळाला आहे. पारंपारिक शाखांबरोबर सेल्फ फायनान्सची कटऑफ वरचढ आहे. सेंट झेवियर्सची कला शाखेची कटऑप 98 टक्यावर पोहचली आहे.

विज्ञान शाखेचाही कटऑफ वाढला

गेल्या काही वर्षात विज्ञान शाखेचा कटऑफ उतरल्याचे दिसत होते. यंदा मात्र या शाखेचा निकालही वाढला. त्याचप्रमाणे वैद्यकीय अभ्यासक्रमासह अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तूकला या अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे यंदा विज्ञान शाखेच्या पात्रता गुणांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: मूलभूत विज्ञान विषयांपेक्षा कम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र या अभ्यासक्रमांकडे विद्याथ्र्यांचा ओढा अधिक असल्याचे दिसत असल्याचे विविध महाविद्यालयातून सांगण्यात आले.

असा आहे कटऑफ

जय हिंद महाविद्यालय

बीए 96.20
बीकॉम 93
बीएस्सी 75
रुईया महाविद्यालय
बीएस्सी 88
बायोअनॅलिटीकल
सायन्स 97.33
बायोकेमिस्ट्री 98.8
बायोटेक्नॉलॉजी 99
कम्प्युटर सायन्स 98.17
अनुदानित 98.83
बीए 98

रुपारेल महाविद्यालय

बी ए प्रथम 93.16
बीएमएस आर्ट्स 84.66
बीएमएस कॉमर्स 89.83
बीएमएस सायन्स 88
बीकॉम प्रथम वर्ष 85.33
बीएस्सी प्रथम वर्ष 85.83

बिर्ला महाविद्यालय

बीए 80
बीकॉम 86
बीएस्सी —
पीसीएम 66.15
सीबीझेड 65
मायक्रोबायोलॉजी 85

Back to top button