जास्त कॅल्शिअम घेतल्यास तुम्ही 'या' आजाराचे होऊ शकता शिकार | पुढारी

जास्त कॅल्शिअम घेतल्यास तुम्ही 'या' आजाराचे होऊ शकता शिकार

पुढारी ऑनलाईन डेस्क : हाडं, हृदय आणि दातांच्या आजारापासून वाचण्यासाठी ‘कॅल्शिअम’ गरजेचे आहे. कमतरतेमुळे अनेकजण आजारांना बळी पडतात. पण कॅल्शिअम जास्त झाल्यासही आजारांना बळी पडाव लागत. जर एखाद्याने प्रमाणापेक्षा जास्त कॅल्शिअम घेतले तर तो ‘हायपरकॅल्सिमिया’ या आजाराचा शिकार होऊ शकतो.

हायपरकॅल्सिमिया हा एक असा आजार आहे रक्तात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त होते. आणि त्याचा परिणाम शरिरातील अवयवांवर होऊ लागतो.

हायपरकॅल्सिमिया म्हणजे काय?

कॅल्शिअम आपल्या शरिरात आढळणारे खनिज आहे. पण जर तुमच्या रक्तात सामान्यपेक्षा अधिक कॅल्शिअम असेल तर डॉक्टर याला हायपरकॅल्सिमिया असं म्हणतात. ही एक गंभीर स्थीती आहे. ही स्थिती वय वाढल तशी वाढत असते. यात हाडं कमजोर होणे, किडणीचा त्रास होणे, हृदयाचे आजार होणे, तसंच कॅन्सरही होऊ शकतो.

हायपरकॅल्सिमिया चे कारण

१) पॅराथायरॉईड हार्मोन

पॅराथायरॉईड, थायरॉईड गळ्याजवळ चार ग्रंथी असतात तिथून पॅराथायरॉईड हार्मोन तयार होतात. पीटीएच शरिरात कॅल्शिअमचे बरोबर संतुलन ठेवण्यासाठी मदत करते. पण जर हे हार्मान्स असंतुलित होतात. तेव्हा शरिरात कॅल्शिअमची लेवल बिघडते. ज्यामुळे हायपरकॅल्सिमिया होतो.

२) ज्यादा कॅल्शिअमचे सेवन

एका वयानंतर शरिरात कॅल्शिअम कमतरतेचे लक्षण दिसू लागते. यात अनेकजण कॅल्शिअमपूर्ण खाद्य तसेच कॅल्शिअमचे सप्लिमेंट्सही घेतले जातात. ज्यामुळे रक्तात कॅल्शिअम प्रमाण वाढते. आणि हायपरकॅल्सिमिया होण्याचा धोका वाढतो.

३) विटामीन ‘डी’ जास्त प्रमाण

विटामीन ‘डी’ जास्त प्रमाणात घेतल्यामुळे शरिरात कॅल्शिअमचे संतुलन बिघडते. सप्लिमेंटच्या स्वरुपात अधिक विटामीन डी, किंवा कॅल्शिअम घेतल्यामुळे आपल्या शरिरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते. यात हाडं रक्तात कॅल्शिअम सोडतात. जे रक्तात मिसळतात. आणि कॅल्शिअम चे प्रमाण शरिरात वाढते. याशिवाय पित्ताचे औषधे देखील शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढवतात.

४) फुफ्फुसांचे आजार आणि कर्करोग

फुफ्फुसांचे अनेक गंभीर आजार आहेत. जे तुमच्या विटामीन डी चे स्तर वाढवू शकतात. जेव्हा calcium अधिक प्रमाणत शोषून घेतल जातं. ज्यामुळे तुमच्या रक्तात कॅल्शिअम चे प्रमाण वाढते. खासकरुन काही कॅन्सर, विशेष फुफ्फुसाचा कॅन्सर, स्तन कॅन्सर आदी आजार होऊ शकतात.

५) डिहायड्रेशन

डिहायड्रेशन, हायपरक्लेसेमियाची सौम्य लक्षणचे कारण दिसू शकत. तुमच्या शरिरात पाण्याचे प्रमाण कमी असेलतर डिहायड्रेशन शरिरातील calcium वाढवू शकत. पाणी कमी असेलतर किडनी व्यवस्थित काम करत नाही. आणि किडनी कमी कॅल्शिअमचे उत्सर्जन करते. आणि अधिक विटामीन डी सक्रिय करते. जे calcium शोषण ची महत्वपूर्ण भूमिका निभावते. या पध्दतीने शरिराचे संतुलन बिघडते. आणि हायपरकॅल्सिमिया चा धोका वाढतो.

हायपरकॅल्सिमियाची लक्षणे-

  • भूख न लागणे
  • सारखी तहाण लागणे
  • वारंवार लघविला येणं
  • उलटी आणि चक्कर येणं
  • पोटात दुखणं
  • डिप्रेशन
  • थकवा
  • स्मृती भ्रंश

ही हायपरकॅल्सिमियाची सुरुवातीची लक्षणे आहेत. ही कालांतराने तीव्र होऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला काही गंभीर आजारांमधून जावे लागेल.

हे ही वाचलत का :

विद्यार्थ्यांनी CA होण्याचे स्वप्न बाळगावे : C.A डॉ. दिलीप सातभाई

Back to top button